Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेचे मोठे वक्तव्य, म्हणाली – ‘बॉलिवूडमध्ये महिलांना…’

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने तिच्या दमदार अभिनय आणि बोल्डनेसमुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राधिकाने आतापर्यंत अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे राधिकाने प्रत्येक चित्रपटात वेगळी छाप सोडली आहे. राधिकाने (Radhika Apte) फक्त मराठी आणि हिंदीमध्येच काम नाही केले तर तिने तामिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येसुद्धा काम केले आहे. राधिकाने ‘बदलापूर’ आणि ‘हंटर’ या चित्रपटांमध्ये सेक्स कॉमेडी (Sex comedy) भूमिका केल्या होत्या. त्यानंतर तिला अशाच भूमिका ऑफर होऊ लागल्या. यासंदर्भात तिने एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली राधिका?
बदलापूरनंतर राधिकाला काही सेक्स कॉमेडी ऑफर करण्यात आली होती. मला सेक्स कॉमेडी करायला हरकत नाही.
हंटर हा चित्रपट देखील एक सेक्स कॉमेडी होता पण, बॉलीवूडमध्ये आपल्याकडे अशा प्रकारचे सेक्स कॉमेडी चित्रपट आहेत.
महिलांची अवहेलना झाली आहे. बघितले तर बॉलीवूडमध्ये सेक्स कॉमेडीच्या नावाखाली महिलांची विक्री होते
आणि मला अशी कॉमेडी आवडत नाही. त्यामुळे मी ते करत नाही.” असे राधिका एका मुलाखतीदरम्यान म्हणाली.

राधिका आपटेच्या (Radhika Apte) कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने नेहमीच आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपटांमध्ये काम केले.
राधिकाने ‘पॅड मॅन’, ‘मांझी-द माऊंटमॅन’, ‘अंधाधुन’, ‘बदलापूर’, ‘पार्च्ड’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Web Title :- Radhika Apte | radhika apte talk about why she rejected sex comedy roles

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kantara Movie | ‘कांतारा’ पाहून रजनीकांत यांच्या अंगावर आला काटा! चित्रपटासाठी लिहिली भावूक पोस्ट

Raosaheb Danve | मनसे म्हणजे फटाक्याची लड, फुटायला लागली की थांबत नाही पण फायदाही होत नाही, दानवेंनी पवार, शिवसेनेला दिली ‘ही’ उपमा