Sanjay Dutt | ‘खलनायक’ चित्रपटासाठी संजय दत्त नव्हता पहिली पसंत; बॉलीवुडचा ‘हा’ खान साकारणार होता पात्र

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा ‘खलनायक’ म्हणालं की एकच व्यक्ती डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt). दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) यांचा अजरामर चित्रपट ‘खलनायक’ (Khalnayak Movie) हा बॉलीवुडमधला सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे. या मधील संजय दत्त यांच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनाला हे पात्र भिडलं. मात्र हिरो म्हणून काम करणाऱ्या संजय दत्त यांना निगेटीव्ह भूमिका एवढी जबरदस्त जमेल असं कोणालाच वाटलं नसेल. अगदी दिग्दर्शक सुभाष घई यांची सुद्धा संजय दत्त (Sanjay Dutt) ही भूमिकेसाठी पहिली निवड नव्हती.

अभिनेता संजय दत्त याने ‘रॉकी’ या चित्रपटामधून (Rocky Movie) बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. संजय दत्त यांना हिरो म्हणून प्रेक्षकांनी पसंत केले होते. मात्र खलनायक चित्रपटासाठी त्याने निगेटीव्ह भूमिका साकारली. चित्रपटाच्या लिखानाचे काम सुरु असताना सुभाष घई यांनी या पात्रासाठी अभिनेता आमिर खानला (Aamir Khan) पहिली पसंती दर्शवली होती. मात्र त्यावेळी आमिर कोणत्याही प्रकारची निगेटीव्ह भूमिका साकारण्यासाठी तयार नव्हता. यामुळे आमिर खानने खलनायक चित्रपटाला नकार दिला. आमिर नंतर सुभाष घई यांनी नाना पाटेकर (Nana Patekar) यांची निवड केली. त्यावेळी नाना व जॅकी दादा (Jackie Shroff) यांची जोडी देखील खूप फेमस होती.

नाना पाटेकर यांना ‘खलनायक’ चित्रपटासाठी फायनल करण्यात आले. व त्यानंतर सुभाष घई यांनी पुन्हा पात्र लिहून ते रंगवण्यास सुरुवात केली. मात्र ते लिहित असताना त्यांच्या लक्षात आले की नाना पाटेकर हे या पात्रासाठी योग्य निवड ठरणार आहे. त्यानंतर त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट अभिनेता संजय दत्तला ऐकवली. यावर संजय़ दत्त यांनी देखील चित्रपटासाठी (Sanjay Dutt In Khalnayak) होकार दिला. या पात्रासाठी अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) य़ांनी देखील इच्छा बोलून दाखवली होती मात्र त्याआधी संजय दत्तने चित्रपटासाठी होकार दिला होता.

अशा पद्धतीने अखेर सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ चित्रपटाला त्यांचा खलनायक भेटला.
हे पात्र संजय दत्तने अक्षरशः गाजवले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला.
संजय दत्त मोठ्या पडद्यावर ‘हां.. मैं हूं खलनायक’ असा डायलॉग म्हणाला लागला की चित्रपटगृहामध्ये एकच
जल्लोष केला जाई. पुढे संजय दत्तचा (Sanjay Dutt) हा ‘खलनायक’ चित्रपट सिनेविश्वामध्ये सुपरहिट ठरला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alia Bhatt | आलियाच्या बॅगमध्ये तिच्या पेक्षा राहाचे सामान असते जास्त; “माझी बॅग आता माझी राहिली नाही”

Samantha Ruth Prabhu | सामंथाने अवघ्या 4 डिग्रीमध्ये घेतला थंडगार आइस बाथ; व्हिडिओ व्हायरल