Video : अभिनेता संजय दत्त निर्मित ‘बाबा’ चित्रपटाचा ‘निःशब्द’ करणारा ट्रेलर लॉंच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने एक निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. अभिनेता संजय दत्त आणि पत्नी मान्यता दत्त यांनी निर्माण केलेला चित्रपट ‘बाबा’ची खूप चर्चा होत आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता.

टीझरच्या प्रतिसादानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. या ट्रेलरमध्ये मूकबधीर दाम्पत्याचा आपल्या मूकबधीर लेकरासाठाचा लढा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर बाप-लेकाची अनोखी कथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि बालकलाकार म्हणून आर्यन मेंघजी असणार आहे.त्याचबरोबर ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’फेम बॉलिवूड अभिनेता दीपक डोब्रियाल मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. दीपकच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री नंदिता धुरी करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांचा उत्साह वाढविणारा आहे.

हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केले आहे. गुप्ता हे अभिनेत्री माधुरी दिक्षितचा चित्रपट ‘बकेट लिस्ट’ चे सह-दिग्दर्शक होते.

या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल थोडक्यात माहिती, मूकबधीर दाम्पत्याचं मूकबधीर लेकरु, अचानक एका महिलेने हे मूल आपले असल्याचा दावा केला, त्यानंतर त्यांच भावविश्व, असे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येते. मनाला भावणारा ट्रेलर तुम्ही नक्कीच पहा.

आरोग्यविषयक वृत्त

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

 

Loading...
You might also like