मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी कृपाशंकर सिंग किंवा भाई जगताप यांची निवड होण्याची चर्चा सर्वत्र आहे.

[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36ca60b1-7e7b-11e8-982f-4fc6f388d55f’]

बेहिशोबी मालमत्तेवरून कृपाशंकर सिंग अडचणीत आले होते. पण बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपातून बाहेर आल्यानंतर त्याच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुंबईत मराठी माणूस अध्यक्षपदी असावा, यासाठी काँग्रेसमधील एक गट आग्रही आहे.

काँग्रेसच्या  ‘महाराष्ट्र प्रभार अधिकारी’ पदी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती झाल्यांनतर घटनात्मक बदल मोट्या प्रमाणात केले जात आहेत. याच अंतर्गत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांना दूर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.