Sanjay Raut After Supreme Court Hearing | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांची भविष्यवाणी, म्हणाले – ’72 तासांत हे सरकार जाणार…’

मुंबई : Sanjay Raut After Supreme Court Hearing | ७२ तासांत हे सरकार जाणार…७२ तास. मी आधीही बोललो होतो. आता वेळ आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी आयसीयूमध्ये टाकून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांनाच आयसीयूमध्ये जाण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिरंगाईबाबत विधानसभा अध्यक्षांना कठोर शब्दात सुनावल्यानंतर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Sanjay Raut After Supreme Court Hearing)

आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification Case) प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांसमोरील होणाऱ्या सुनावणीतील दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI Dhananjay Chandrachud) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar) यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच सुनावले आहे. यानंतर राऊत यांनी राज्य सरकारबाबत ही भविष्यवाणी केली. (Sanjay Raut After Supreme Court Hearing)

दरम्यान, आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेल्या विलंबा बाबत सरन्यायाधीशांनी म्हटले की, १४ जुलैमध्ये आम्ही नोटीस काढली. सप्टेंबरमध्ये आदेश काढला. पण विधानसभा अध्यक्षांनी काहीच केले नाही.
विधानसभा अध्यक्षांनी जूनपासून काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता त्यांनी पुढील निवडणुकीच्या आधी निर्णय घ्यावा, नाहीतर आम्हाला एक आदेश काढावा लागेल.

सोमवारपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ.
कारण आमचे आदेश पाळले जात नाहीत. महाराष्ट्रातील निवडणुकांच्याआधी निर्णय घ्यायला हवा.

फक्त वेळकाढूपणाचे धोरण अध्यक्ष राबवत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाही. आदेशाचे पालन करावच लागेल, हे कुणी तरी विधानसभा
अध्यक्षांना सांगितले पाहिजे. विधानसभा अध्यक्षपद घटनात्मकपद असले तरी आम्ही आदेश देऊ शकतो.

अपात्रतेचं प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे. विधानसभा अध्यक्ष वेळेत निर्णय घेत नसतील तर त्यांनाच जबाबदार धरावे लागेल, असे सरन्यायाधीश म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाच घेताना RTO मधील क्लास 1 अधिकारी, कनिष्ठ लिपिक व पंटर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chandrakant Patil On Baramati Lok Sabha | बारामती जिंकण्याची हिच संधी, कामाला लागा, चंद्रकांत पाटीलांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘पालकमंत्रीपद ही…’