Urfi Javed | उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं! स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली – ‘…चित्रा वाघ ग्रेट है’

पोलीसनामा ऑनलाईन : मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद हा थांबायचे नाव घेत नाही आहे. उर्फी जावेद छोटे कपडे घालून समाजात न्यूडीटी पसरवत असल्याचा आरोप करत तिच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुबई पोलिसांकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एक पत्रदेखील लिहिले आहे. तसेच चित्रा वाघ यांनी उर्फी दिसेल तिथे तिला थोबाडणार असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उर्फी जावेद हिनेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. (Urfi Javed)

उर्फी जावेद अधूनमधून चित्रा वाघ यांना डिवचत असते. काल उर्फीने एक फोटो पोस्ट करत त्याला “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असे कॅप्शन दिले होते. यानंतर आता तिने चित्रा वाघ यांना डिवचणारे ट्विट केले आहे. यावेळी उर्फीने तिच्या ट्विटमध्ये स्वतःच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख केला आहे. या ट्वीटमध्ये तिने चारोळी लिहिली आहे. “उर्फी की अंडविअर मे छेद है, चित्रा वाघ ग्रेट है,” असं ट्वीट तिने केलं आहे. त्यात स्वतःच्याच अंतर्वस्त्राचा उल्लेख करत तिने चित्रा वाघ महान असल्याचे म्हंटले आहे. तसेच तिने या ट्विटच्या पुढे तीन रेड हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. (Urfi Javed)

मागच्या दोन आठवड्यांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांचा वाद सुरू आहे.
या वादावर अमृता फडणवीसांपासून ते अनेक राजकारण्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आता उर्फीच्या या ट्विटला चित्रा वाघ काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- Urfi Javed | urfi javed teases chitra wagh is  great new tweet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारमधील भ्रष्टचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांवर सामनातून जहरी टीका…

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचे उर्फी जावेदबद्दल मोठे विधान; म्हणाल्या – ‘उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही’

Pune Crime News | इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार ! गरम पाण्याची पिशवी लिक झाल्याने रुग्ण भाजला, डॉक्टरांसह स्टाफवर गुन्हा दाखल