Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा भाजपला सवाल; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On BJP | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना धमकी दिल्याची राज्यात चर्चा होत आहे. ‘बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,’ असं ते म्हणाले. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत नारायण राणे यांना थेट सवाल केला आहे. ‘शरद पवारांना राणेंनी दिलेली धमकी भाजपची (BJP) भूमिका आहे का?’ असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut On BJP)

 

 

“महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल… पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. (Sanjay Raut On BJP)

दरम्यान, ‘जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत.
मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं.
त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावंच लागेल.”असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
“माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत.
ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut On BJP | shivsena leader and mp sanjay raut tweet on
union minister narayan ranes threat to ncp leader sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा