Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा, 4 जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील

अहमदनगर : Sanjay Raut On CM Eknath Shinde | नाशिकचे (Nashik Lok Sabha) ठाकरे गटाचे (Shivsena UBT) जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस (Tadipari Notice) काढली आहे. मात्र, बडगुजर यांनी नोटीस स्वीकारली नाही. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महायुती सरकारकडून (Mahayuti Govt) राजकीय कोंडी करण्यासाठी ही नोटीस काढल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सलीम कुत्ता डान्सप्रकरणी (Salim Kutta dance incident) बडगुजर यांना ही नोटीस काढली आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना इशारा देताना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, ऐन निवडणुकीत नाशिकचे आमचे नेते, ज्यांच्या हाती प्रचाराची सूत्रे आहेत, त्यांना तडीपारीची नोटीस देता. मात्र जे गुंड आहेत त्यांना जेलमधून सोडवले आहे. ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीसोबत फिरत आहेत. ४ जूननंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील अशाप्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत, लिहून ठेवा.(Sanjay Raut On CM Eknath Shinde)

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आणि त्यांची टोळी यांच्यावर इतके अपराध आहेत, त्यांना तडीपारीची नोटीस दिली जाईल
असे गुन्हे आहेत. ज्या गुन्ह्यासाठी ते ईडीला घाबरून पळून गेले. तीच ईडी त्यांच्या मागे लागेल. त्यांना कुणीही वाचवणार नाही.
मोदी-अमित शाह-फडणवीस कुणी येणार नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी.

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलावे ही गमंत आहे. घोटाळे बाहेर पडत आहेत, मला अटक होईल
या भीतीने ज्यांचे पाय लटपटू लागले, डोळ्यातून अश्रू काढले, हा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो हे आश्चर्य आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्ही झेंडे उचलणार नाही, भाजपाची अंत्ययात्रा उचलू.
मोदी निवडणूक हरत आहेत. ४ जूननंतर भाजपा सत्तेवर नसणार. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची खुर्ची वाचवावी.
आम्ही आमचा पक्ष संकटात वाढवला आहे. जुने जातात, नवीन येतात. पक्ष वाढत असतो. आमच्याकडे आत्मविश्वास आहे.
लोकांवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे पक्षनेतृत्व हे पक्ष पुढे नेण्यासाठी सक्षम आहे, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Chandrakant Patil | अजितदादा स्पष्टच म्हणाले, ”चंद्रकांत पाटील ते चुकीचंच बोलले, आम्ही त्यांना सल्ला दिला …बारामतीत आमचे कायकर्ते पाहुन घेतील”

Pune Crime News | पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनींचे चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या दोघांवर FIR, विद्यार्थिनीचा समावेश

Kondhwa Pune Crime News | पुणे : गाडीची लाईट डोळ्यावर चमकल्याने 20 जणांच्या टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण (Video)

Murlidhar Mohol | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची हास्यक्लबला भेट ! नवा भारत घडविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन