Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मीच संपवणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sanjay Raut on Kirit Somaiya | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर काल (मंगळवारी) ED ने टाच आणली. कारवाईनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलंच वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यावेळी राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut on Kirit Somaiya)

 

”किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. ही कीड मी संपवेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी सोमय्या यांना लक्ष्य केले आहे. तसेच, संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर Save INS Vikrant या मोहीमेखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ”किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत’ या उपक्रमातंर्गत जमा झालेले पैसे राजभवनाकडे सुपूर्द करू, असे म्हटले होते.
मात्र, हे पैसे राजभवनाला देण्यातच आले नाहीत.
राजभवनाकडून माहिती अधिकारातंर्गत हा खुलासा करण्यात आला. महाराष्ट्रात भाजपचे राज्यपाल आहेत.
आमचा शाखाप्रमुख तिकडे बसलेला नाही. भाजपचा प्रमुख आधारस्तंभ राजभवनात बसले आहेत.
त्यांच्याकडूनच सेव्ह विक्रांत मोहीमेचा निधी आपल्याला मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
ही माहिती ऑन पेपर देण्यात आलीय. याच्यापेक्षा आणखी कोणता वेगळा पुरावा हवाय?” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”किरीट सोमय्या यांनी 2014 साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती.
या मोहीमेत 57 ते 58 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती.
ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली.
हा पैसा त्यांनी 2014 ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत (Nikon Infra Company) वळवला,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

 

Web Title :- Sanjay Raut on Kirit Somaiya | i will finish kirit somaiya says shivsena mp sanjay raut after corruption charges save vikrant money

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा