Sanjay Raut on Navneet Ravi Rana | संजय राऊत नवनीत आणि रवी राणांना ‘बंटी-बबली’ म्हणत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on Navneet Ravi Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर (Matoshree) जाऊन हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पठण करणार असल्याचं म्हटलं होतं. राणा दाम्पत्य आज मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती समजत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Navneet Ravi Rana) यांनी राणा दाम्पत्यांना बंटी-बबली (Bunty-Babli) अशी उपहासात्मक उपाधी दिली आहे.

 

बंटी आणि बबली जर पोहोचले असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही. ही स्टंटबाजी असून हे फिल्मी लोक आहे. स्टंटबाजी किंवा मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आता भाजपला (BJP) अशा लोकांची गरज भासते आपल्या मार्केटिंगसाठी. हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची गरज असून आम्हाला हिंदूत्त्व माहित असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कोणाला काय स्टंट करायचे आहेत त्यांना करू द्या, या स्टंटने काही फरक पडत नाही.
कारण शिवसैनिकांना अशा स्टंट्सचा अनुभव आहे.
त्यांना अजून माहित नाही मुंबईचं पाणी काय आहे आणि शिवसेना काय आहे.
हनुमान चालिसा वाचणं, रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे विषय आहेत.
हे नौटंकीचे आणि स्टंटचे विषय नाहीत. मात्र भाजपने हिंदूत्त्वाची नौटंकी आणि स्टंट करून ठेवली असून
ही त्यातील पात्र असल्याचं म्हणत राऊतांनी राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला.

 

दरम्यान, भाजप सध्या मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार्स (C Grade Filmstars) आणि स्टंटबाज यांचा उपयोग करून घेत आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचं राऊत म्हणाले.

 

Web Title :-  shivsena mp sanjay raut targets navneet rana and ravi rana over hanuman chalisa row

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा