Sanjay Raut | ‘दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झालं’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावर दाखल झालेले सर्व खटले सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याच्या याचिकेवरील सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या Saamana ‘सामना’च्या अग्रलेखातून न्यायालयावर टीकास्त्र सोडलं आहे.

 

दिल्लीच्या (Dehli) हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झालं आहे. न्यायाचा तराजू हलतोय आणि सत्याची गळचेपी सुरू आहे. अशा वेळेला न्यायालयांनी (Court) जनतेचा आवाज बनायला हवं. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावं लागेल. मात्र आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आवळीत असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

 

राज्याचे पोलीस (Police) परमबीरांच्या सर्व वीरकथांचा तपास करीत होते, त्यांनी फास आवळत आणलाच होता,
पण सर्वोच्च न्यायालयाने तडकाफडकी परमबीरांची प्रकरणे सीबीआयकडे सोपवली.
राज्याच्या पोलिसांवरचा अविश्वास धक्कादायक आहे, असंही राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

 

दरम्यान, माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला काळजी वाटत नाही.
महाराष्ट्रातील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की, त्यांनी न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही.
पण या गोष्टींमुळे आम्हाला फरक पडत नाही,
उलट अशा गोष्टींना आम्ही केराची टोपली दाखवत असल्याचं म्हणत न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश (Justice Sanjay Kishan Kaul & Justice MM Sundaresh) यांच्या खंडपीठाने राऊतांना फटकारलं होतं.

 

Web Title :- Sanjay Raut | saamana editorial on supreme court decision about parambir singh case and comment on sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा