Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि खासदार यांना घेऊन गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला आणि नवस फेडण्यासाठी गेले आहेत. त्यावरुन विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लावला आहे. महाराष्ट्रातले देव संपले का, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

महाराष्ट्राची सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाण्यात आहेत. आणि मुख्यमंत्री 40 रेडे घेऊन गुवाहाटीला नवस फेडायला गेले आहेत. आपल्याकडे आज पेटलेल्या मशाली आहेत. या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत. ही भूमी जिजाऊंची भूमी आहे. ज्या मातेने आम्हाला शिवाजी राजा दिला, त्यांची ही भूमी आहे. त्या भूमीत आज गद्दारांची बीजे रोवली गेली आहेत. ती बीजे कायमची नष्ट करण्यासाठी या मशाली पेटल्या आहेत, असे यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. राऊत बुलढाणा जिल्ह्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

सर्वांत जास्त खोके या बुलढाणा जिल्ह्यात आले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात एक खासदार आणि दोन आमदार आहेत.
संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते.
आणि मुख्यमंत्री 40 रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले आहेत.
हे या राज्याचे दुर्देव आहे. एकही खोकेवाला पुन्हा निवडून येता कामा नये, अशी शपथ आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असेही यावेळी राऊत म्हणाले.

Web Title :-  Sanjay Raut | sanjay raut criticized cm eknath shinde on guwahati visit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर बोपदेव घाटात गोळीबार, शहरातील गोळीबाराची तिसरी घटना

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या मुलीने एव्हरेस्टचा बेस कॅम्प 7 दिवसात केला सर

Vikram Gokhale Death | विक्रम गोखलेंनी दोन वेळा घेतला होता अभिनयातून संन्यास; पहिल्यावेळी संन्यास घेण्याचे ‘हे’ सांगितले होते कारण