Sanjay Raut | ‘लोकांना कधी कधी वाटत अजुनी यौवनात मी…’ फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सतत विरोधकांवर निशाणा साधत खोचक टीका करत असतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेलं एक विधान सध्या चर्चेत आले आहे. या विधानावर भाष्य करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी देखील खोचक टोला लगावला होता.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मन की बात’ केली. मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री (CM) नाही.
मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.
मागील दोन वर्षे एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनेतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचे जाणवू दिलं नाही.
विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल.
त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असेही फडणवीस म्हणाले होते.

अजून मी यौवनात… फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे.
लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी. असं एक नाटक रंगमंचावर गाजलंय. ते चिरतरुण नाटक होतं.
तसं अनेकांना वाटतं की अजूनही यैवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री. आम्हालाही कधीकधी दिल्लीत गेल्यावर वाटतं आमचाच पंतप्रधान (PM) होणार, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

 

माणसानं स्वप्नात रममाण व्हावं

त्यांची भावना योग्य आहे. माणसानं स्वप्नात रममाण व्हावं. चांगली स्वप्न (Dream) पाहावीत. स्वप्नांत बळ असावं.
त्यांच्या पंखात अधिक ताकद येवो आणि आकाशात उडण्यासाठी त्यांना बळ यावं.
अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांच आयुष्य ही स्वप्न बघण्यात जावं, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

त्यांनी कायम सावलीत रहावं

महाराष्ट्र गतीमान आहे. गेल्या काही महिन्यात कार्य मोठ्या प्रमाणात पुढे गेलं आहे.
गेल्या आठ दिवसांतल्या कामाचा लेखाजोखा पाहिला, तर विरोधी पक्षाला वाईट वाटण, पोटात दुखणं सहाजिक आहे.
विरोधी पक्षनेत्याला आम्ही नेहमी शॅ़डो चीफ मिनीस्टर (Shadow Chief Minister) म्हणतो.
या सावलीत त्यांनी कामय रहावं, असा टोला देखील राऊतांनी लगावला.

 

Web Title : Sanjay Raut | sanjay raut shivsena mocks devendra fadnavis bjp on chief minister statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, चंद्रकांत पाटलांचा पलटवार (व्हिडीओ)

Sanjay Raut | सध्या महाराष्ट्रात फक्त ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला, संजय राऊत म्हणाले – ‘पुणे आणि पिंपरी चिंचवडचा महापौर शिवसेनेचा असेल, आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करु’ (व्हिडीओ)

Arthritis Disease | सावधान ! केवळ ज्येष्ठांमध्ये नव्हे, 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील होऊ शकतो हाडांचा ‘हा’ भयंकर आजार