Sanjay Raut | उदयपूरच्या हत्येचा उल्लेख करत संजय राऊतांचं ट्विट; म्हणाले – ‘पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ब्राह्मण महासंघाचे (Brahman Mahasangh) नेते आनंद दवे (Anand Dave) यांच्या जिवितास धोका असल्याचे म्हणत पुणे पोलिसांकडे (Pune Police) त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत यावर आपली भूमिका मांडली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूरमध्ये ज्या प्रकारे हत्याकांड (Udaipur Murder Incident) झालं त्याचाही उल्लेख केला आहे. राऊत (Sanjay Raut) यांच्या ट्विटनंतर आता पुणे पोलीस काय पावलं उचलणार हे पाहावं लागेल.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ब्राह्मण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांनी (Central Investigation Agency) महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

 

भाजपच्या (BJP) माजी वादग्रस्त प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या विधानानंतर देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यावरुन पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून इशारा देण्यात
आला असून केंद्रीय यंत्रणेनी यावेळी दवे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

 

काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा हिने प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad Paigambar)
यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तसेच तिच्या समर्थनात पोस्ट केल्यानंतर उदयपूर येथे दोन तरुणांनी कन्हैय्या लाल नावाच्या एका टेलरची निर्घृण (Kanhaiya Lal Murder) हत्या केली होती.
त्यानंतर महाराष्ट्रातील अमरावती येथे औषध विक्रेता उमेश कोल्हे (Umesh Kolhe)
यांनी नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
त्यांची 21 जून रोजी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली होती.
यापर्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणेने दवे यांना सतर्क राहण्याच सल्ला दिला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut tweet to pune police on anand dave security threat mention udaypur murder incident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ekda Kay Zala Movie | ‘एकदा काय झालं !’ चित्रपटाने ठेवला ‘प्लास्टिक फ्री’ सेट!

 

Devendra Fadnavis | अजित पवार कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असे वाटत नाही, फडणवीसांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

 

Pune Crime | शेजार्‍याला मदत केल्याने महिला अडचणीत; अनाथ आश्रमात आली रहायची वेळ, वारजे माळवाडी परिसरातील घटना