Pune Crime | शेजार्‍याला मदत केल्याने महिला अडचणीत; अनाथ आश्रमात आली रहायची वेळ, वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेजारी राहणार्‍याशी मैत्री झाली. त्यातून त्याला अडचणीत मदत करण्यासाठी या महिलेने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्याला वेळोवेळी मदत केली. मात्र, त्याने फसवणूक (Cheating Case) केल्याचे लक्षात आले. त्यामुळे या महिलेच्या घरात भांडणे झाली. तिला शेवटी अनाथ आश्रमात आश्रय घेण्याची वेळ आली. (Pune Crime)

 

याप्रकरणी वारजे माळवाडी (Warje Malwadi) येथील एका महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५१/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश शांताराम नाईक Akash Shantaram Naik (वय २८, रा. मनोहर दांगट इस्टेट, शिवणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहानंतर वारजे जकातनाका येथे रहात होत्या.
त्यानंतर त्या शिवणे येथे राहण्यास आल्या. २०२० मध्ये लॉकडाऊन झाल्याने त्या घरीच रहात असे.
त्यांच्या घराशेजारी आकाश नाईक रहात होता. पतीबरोबर तो घरी येत असल्याचे त्यांची ओळख झाली.
७ जुलै २०२१ रोजी आकाश हा त्यांच्या घरी दारु पिऊन आला.
त्याने आपली रिक्षा गहाण ठेवली असून ती सोडविण्यासाठी पैशांची मागणी करु लागला.
फिर्यादी यांनी पैसे नसल्याचे सांगून त्याला नकार दिला. त्यानंतर तो २१ जुलै रोजी पुन्हा घरी आला.
रिक्षा सोडविण्यासाठी पैशांची मागणी करु लागला.
तेव्हा फिर्यादी यांनी मैत्रीखातर त्यांच्याकडील २५ ग्रॅम वजनाचा राणीहार व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी उत्तमनगर येथील ज्वेलर्सकडे गहाण ठेवले.
त्यातून आलेले ६० हजार रुपये व नेकलेस, कर्वेनगर येथील ज्वेलर्सकडे गहाण ठेवून त्यातून आलेले २० हजार रुपये आकाश याला दिले.
त्यानंतर आकाश १३ जानेवारी २०२२ रोजी पुन्हा आला व मैत्रीची शपथ घालून त्याने २ ग्रॅमची अंगठी घेऊन ती एका ज्वेलर्सकडे गहाण ठेवून ५ हजार रुपये घेतले.
त्यानंतर आकाश शी संपर्क न झाल्याने तो रहात असलेल्या परिसरात माहिती घेतली.
तेव्हा आकाश याच्याकडे कोणतीही रिक्षा नसून त्याने कोणतीच रिक्षा गहाण ठेवली नसल्याची माहिती मिळाली.
त्यावेळी त्यांनी आकाश याच्याशी संपर्क साधला असता त्याच्या मोबाईल बंद असल्याचे दिसून आले.
त्याच्याकडे फिर्यादी यांनी पैशांची मागणी केल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे त्यांचे पती आता आपल्या आईकडे रहायला गेले असून फिर्यादी यांना अनाथ आश्रमात रहायची वेळ आली आहे.
वारजे माळवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 44 year old business woman cheated to get tender for paper bags FIR lodged at Wanwadi police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा