Sanjay Raut | संजय राऊत मातोश्रीवर नंतर जाणार सर्वप्रथम शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कथित पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणातून जामीनावर सुटका करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. शिवसैनिकांनी संजय राऊत यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर त्यांनी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे देखील दर्शन घेतले. त्यानंतर ते आज (दि. 10) सिल्वर ओक या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

संजय राऊत आणि शरद पवार यांचे राजकीय संबंध चागले आणि सर्वश्रूत आहेत.
2019 साली भाजपसोबत मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली.
आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यावेळी त्या युतीचे शिल्पकार म्हणून शरद पवार
आणि संजय राऊत यांचे नाव अग्रस्थानी होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील दुवा म्हणून संजय राऊत यांनी काम पाहिले आहे. पण त्यांची ही युती शिवसेनेतील बऱ्याच आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हती. त्यातूनच त्यांनी बंड केले, असे बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांचे मत आहे.

संजय राऊत यांच्या अटकेवर शरद पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती.
तसेच त्यांनी त्यांच्या अटकेवर बोलणे देखील टाळले होते.
त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते.
तरी देखील या दोन दिग्गज नेत्यांच्या मैत्रीतील धागा घट्ट असल्याने आता संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत.

Web Title :-  Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut will meet ncp president sharad pawar at silver oak residence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update