Sanjay Raut | ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत यांना दादरमधील फ्लॅट सोडावं लागणार का?; जाणून घ्या नियम काय सांगतोय?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ED Action) टाच आणली. ईडीच्या कारवाईमुळे राज्यातील राजकारण रंगलं असल्याचं दिसत आहे. संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची 11.15 कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आले आहे. राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या (Dadar) फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघर मधील (Raigad And Palghar) मालमत्तेवर जप्ती आणली. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांना दादरमधील ते घर सोडावे लागणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे.

 

अल्फा राजन एंड पार्टनर्स लॉ फर्मचे (Alpha Rajan & Partners Law Firm) पार्टनर राजन गुप्ता (Rajan Gupta) यांनी याबाबत माहिती दिली आहे की, ED कडून पीएमएलए कायद्यांतर्गत (PMLA Acts) एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेच्या मालमत्तेवर टाच आणली जाते. त्यानंतर, हे प्रकरण न्यायालयात जाते. पण, ईडीने कारवाई केल्यानंतर संबंधित व्यक्ती अथवा संस्थेस ही संपत्ती वापरता येते का? असा सवाल अनेकांना पडला आहे. तर, हो ती स्थावर संपत्ती वापरात येते. व्यक्तीगत किंवा व्यवसायिकदृष्ट्या त्याचा वापर केला जाऊ शकतो. पण, या संपत्तीची खेरीदी-विक्री करता येत नाही. त्याचबरोबर, इतर व्यक्तीच्या नावेही ही संपत्ती ट्रान्सफर (Transfer) करता येत नाही. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांचे दादरमधील घर वापरू शकतात.

 

ईडीने मागील दोन ते तीन वर्षात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत.
त्यापैकी अनेक प्रकरणे ही न्यायालयात असून काही प्रकरणांवर अंतिम निर्णयही झाला आहे.
पण, ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संबंधितास न्यायालयात दाद मागता येते.
त्यानंतर, काही प्रकरणात ही संपत्ती परत करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रवीण राऊत (Praveen Raut) यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह संजय राऊत
यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) तसेच स्वप्ना पाटकर (Swapna Patkar)
या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच येथील 8 प्लॉटसह वर्षा राऊत यांच्या नावावरील दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली.
राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या स्वप्ना पाटकर पत्नी आहेत.
किहिम बीच येथील 8 प्लॉटच्या खरेदी व्यवहारात नोंदणी, इतर बाबींचे रोख व्यवहार झाले आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut will raut have to leave his house in dadar due to ed confiscation learn the rules

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vasant More | माजी नगरसेवक वसंत मोरेंना अखेर राज ठाकरेंचा निरोप; ‘शिवतीर्थ’वर दिलं निमंत्रण

 

Aam Aadmi Party | महिलांना सर्व बसमधून मोफत प्रवासाची सुविधा द्या, आम आदमी पार्टीची मागणी

 

Sharad Pawar | ‘नेता चुकीचा असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आज दिसलं’ – शरद पवार