Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, भाजप नेत्यांची बेताल विधाने, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आडमुठेपणा, महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात होत असलेले हल्ले आणि महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जाणे आदी मुद्यांवर महाविकास आघाडीने 17 डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी त्यांना अद्याप राज्य शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्याविरोधात संजय राऊत संतापले आहेत. आपल्या देशात अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाहीत लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा एकप्रकारचा मोर्चाच आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut)

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महापुरुषांचा आणि आमच्यासाठी
दैवत असलेल्या महामानवांचा अपमान घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती खुलेआम करत आहे.
आणि दुर्दैव म्हणजे त्यांचे समर्थन सरकार करत आहे. या विरोधात आमचा मोर्चा आहे.
त्यामुळे आम्ही तो मोर्चा काढू नये का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.
आम्ही मोर्चा काढू नये, असे जर सरकारला वाटत असेल, तर त्यांनी राज्यपालांना पदावरून हटवले पाहिजे.
शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यावर कारवाई झाली पाहिजे.
त्यांनी ती केली नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ आमचा मोर्चा आहे, असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली तरी देखील सीमाभागात तणावपूर्ण परिस्थिती आहे.
आम्ही टोकाची भूमिका घेत नाही. पण लोकांसमोर मुद्दा येणे गरजेचे आहे. आम्ही महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहोत. हा जनतेचा मोर्चा आहे.
आम्ही फक्त नेतृत्व करत आहोत. त्यामुळे आमच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही,
असे यावेळी राऊतांनी नमूद केले.

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on mahavikas agjhadi morcha bjp shinde government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Daibetes – Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Health Tips | जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय आहे का? मग व्हा सावध! होऊ शकतात हे गंभीर आजार