सुशांतच्या मामाचा मोठा खुलासा, संजय राऊतांचा दावा ठरला खोटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपुत प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यातच या प्रकरणावरून राज्यात राजकारण तापू लागलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून सीबीआयने याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. सुशांतच्या प्रकरणावरून भाजप नेत्यांनी बेछुट आरोप केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात उडी घेत सुशांतच्या वडिलांबद्दल गंभीर आरोप केला होता. पण, सुशांतच्या मामाने राऊतांचा दावा खोडून काढला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरामध्ये सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर सुशांतचे मामा आर,सी. सिंग यांनी खुला केला आहे. खासदार संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबीयावर चुकीचे आरोप केले आहेत. त्यांचे हे वक्तव्य प्रतिमा मलिन करणारं आहे. कोणतीही माहिती न घेता उगाच आरोप करून एखाद्याच्या प्रतिमेवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? असा सवाल सिंग यांनी थेट संजय राऊत यांना विचारला आहे. सिंग यांनी म्हटले की, सुशांत आणि त्याच्या वडिलांमध्ये पटत नसले तरीही त्याच्या वडिलांनी कोणतेही दुसरे लग्न केले नाही. ते बिहारमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना माहित आहे, असा खुलासा त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात भाजप, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर काही प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

काय म्हणाले होते राऊत ?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे काहीच कारण नव्हेत. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हेत. त्याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावाला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईत आले, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like