Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायीवारीचे 11 जूनला आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायीवारीचे 11 जून रोजी आळंदीहून पंढरपुरकडे (Alandi To Pandharpur) प्रस्थान होणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई (Yogesh Desai Palkhi Sohala) यांनी दिली आहे. (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi)

रविवार दि. 11 जून रोजी प्रथा-परंपरेनुसार सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास माऊलींच्या पालखीचे वाजत-गाजत प्रस्थान होणार आहे. दर्शनबारी मंडपामध्ये (आजोळी) माऊलींचा पहिला मुक्काम असणार आहे. दि. 12 व दि. 13 जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी राहणार आहे. दि. 14 व दि. 15 सासवड, दि. 16 रोजी जेजुरी, 17 वाल्हे, 18 जूनला नीरा स्नाननंतर 19 जूनपर्यंत पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल. दि. 20 तरडगाव, 21 ला फलटण, 22 बरड, 23 नातेपुते, 24 माळशिरस, 25 वेळापूर, 26 ला भंडीशेगाव, 27 वाखरी तर दि. 28 जून रोजी पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपुरला मुक्कामी पोहोचेल. पंढरीमध्ये आषाढी एकादशीचा महासोहळा (Ashadhi Ekadashi 2023) दि. 29 जून रोजी संपन्न होईल. दरम्यान, पालखी सोहळयात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व पादुकाजवळ उभे रिंगण तर पुरंदवडे, खुडूस फाटा, ठाकुरबुवाची समाधी आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंग होईल.

दि. 3 जुलै पौर्णिमेपर्यंत पालखी सोहळा विठ्ठल नगरीत विसावेल.
गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघेल.
परतीचा प्रवास दि. 3 जुलै वाखरी, 4 वेळापूर, 5 नातेपुते, दि. 6 जुलै रोजी फलटण, दि. 7 जुलै रोजी पाडेगाव, 8 वाल्हे,
9 सासवड, दि. 10 जुलै रोजी हडपसर, 11 जुलै रोजी पुणे, दि. 12 जुलै रोजी आळंदी आणि दि. 13 जुलैला
आळंदीत नगरप्रदक्षिणा पूर्ण करून माऊलींच्या पादुका मंदिरात विसावतील अशी माहिती व्यवस्थापक
ज्ञानेश्वर वीर (Dnyaneshwar Veer Palkhi Sohala) यांनी दिली आहे.

Web Title :-  Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala departs from Alandi for Pandharpur on 11 June

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया