‘मृत्यू’नंतरही ‘जिवंत’ राहतं फक्त ‘कर्म’, त्यामुळं ‘लाभ’ कशात याबाबत विचार करा, जाणून घ्या

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

मायबाप सवें नये धनवित्त |करावें संचित भोगावें तें ||१||
म्हणऊनि लाभ काय तो विचारी |नको चालीवरी चित्त ठेवूं ||२||
आयुष्य शेवटीं सांडुनि जाणार |नव्हेचि साचार शरीर हें ||३||
तुका म्हणे काळें लावियेलें माप |जमा धरी पापपुण्याचीया ||४||

ADV

भावार्थ –

संत तुकाराम महाराज या अभंगात सांगतात, अरे, तू मेल्यानंतर तुझ्याबरोबर तुझे आईबाप, स्री, पुत्र, धन, वित्त यापैकी काहीही येणार नाही; तू आपल्या आयुष्यात जे शुभाशुभ कर्म केले असेल तेच तुझ्याबरोबर येईल; आणि तेच तुला पुढे सुखदुःखरूपाने भोगावे लागेल. म्हणून लाभ कशात आहे, याचा तू विचार कर. व्यवहाराच्या चालीरीतींवर फारसे लक्ष ठेवू नकोस. तुझे आयुष्य केव्हातरी संपणार आहे. कारण, देह हा खरा नाहीच.

तुकाराम महाराज म्हणतात, काळाने तुझ्या आयुष्याला माप लावलेलेच आहे, तो सारखा मोजीत बसला आहे; आणि तू आयुष्यभर केलेले पाप-पुण्य तुझ्या नावे खात्यावर जमा करीत आहे.

म्हणून शुभ कर्म करा. आई वडिलांची सेवा करा. भगवंताचे नित्य नामस्मरण करा. आपल्यापासून इतरांना त्रास होईल असे वागू नका.

हेही वाचा –

‘विठोबा’चे नाम घेताच ‘क्षणार्धात’ कोट्यावधी पापांचा नाश होतो, नक्की वाचा 

‘भजन’, ‘अध्यात्मा’साठी किती वेळ तुमच्याकडं ? अर्धे आयुष्य झोपेत तर उरलेले ‘बालपण’ व ‘आजारपण’ 

देवाला फक्त प्रेमानं ‘हाक’ मारा, तो फुकट ‘नावाडी’ या भवसागरातून तारून नेण्यासाठी धावत येतो 

पसायदान ! ‘खराब’ माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट गुणांचा ‘नाश’ करण्याची प्रार्थना, जाणून घ्या 

‘बंधुप्रेम’ काय असतं, असावं तर ते ‘राम-लक्ष्मणा’सारखं, जाणून घ्या 

देहाचा कधी ‘नाश’ होईल सांगता येत नाही, म्हणून ‘या’ गोष्टींसाठी ‘घाई’ करा, जाणून घ्या 

समाजामध्ये ‘कसं’ राहावं ? ‘हा’ अभंग नक्की वाचा, सर्व काही समजेल