… म्हणून दुसर्‍यांच्या ‘या’ 2 गोष्टींवर ‘डोळा’ ठेवू नये, अभंगात नेमकं काय सांगितलंय हे जाणून घ्या

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

परद्रव्य परनारी अभिलास | तेथोनि ऱ्हास सर्वभाग्य ||१|| घटिका दिवस मास वर्षे लागे तीन | बांधले पतन गांठोडीस ||२|| पुढे घात त्याचा रोकडा शकुन | पुढे करी गुण निश्चयेसी ||३|| तुका म्हणे एका थडता थवड | काळ लागे नाड परी खरा ||४||

या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय वाईट कर्म करणाऱ्यांचा लगेच किंवा कालांतराने नाश होतो हे अटळ असल्याचे सांगतात. तुकोबा म्हणतात, जो दुसऱ्यांचा पैसा किंवा स्त्री किंवा त्याच्या मालकिच्या इतर वस्तू मिळवण्यासाठी अभिलाषा धरतो त्याच्या सर्व भाग्याचा नाश होण्यास सुरूवात होते. त्याचे पतन अटळ आहे. ते एका क्षणात होईल, एका दिवसात होईल, एका महिन्यात होईल किंवा तीन वर्षे किंवा अधिक काळ लागेल पण नाश होणार हे नक्की. त्याचा पुढे घात होईल याची चिन्हे उघड दिसतात. कारण त्याने जे कर्म केलेले असते त्याचे फळ निश्चयाने मिळतेच. एखाद्याचा तत्काळ घात होतो तर काही लोकांच्या बाबतीत कालांतर लागते हे खरे, पण शेवटी दुष्टांचा नाश हा होतोच. म्हणून कधिही दुसऱ्याचा पैसा, संपत्ती, स्त्री मिळवण्यासाठी अभिलाषा धरू नये.

ADV

हेही वाचा –

‘विठोबा’चे नाम घेताच ‘क्षणार्धात’ कोट्यावधी पापांचा नाश होतो, नक्की वाचा 

‘भजन’, ‘अध्यात्मा’साठी किती वेळ तुमच्याकडं ? अर्धे आयुष्य झोपेत तर उरलेले ‘बालपण’ व ‘आजारपण’ 

देवाला फक्त प्रेमानं ‘हाक’ मारा, तो फुकट ‘नावाडी’ या भवसागरातून तारून नेण्यासाठी धावत येतो 

पसायदान ! ‘खराब’ माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट गुणांचा ‘नाश’ करण्याची प्रार्थना, जाणून घ्या 

‘बंधुप्रेम’ काय असतं, असावं तर ते ‘राम-लक्ष्मणा’सारखं, जाणून घ्या 

देहाचा कधी ‘नाश’ होईल सांगता येत नाही, म्हणून ‘या’ गोष्टींसाठी ‘घाई’ करा, जाणून घ्या 

समाजामध्ये ‘कसं’ राहावं ? ‘हा’ अभंग नक्की वाचा, सर्व काही समजेल