Santosh Jadhav | गँगस्टर संतोष जाधवच्या वास्तव्याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाबी गायक आणि कँग्रेसचा नेता सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala Murder Case) यांच्या हत्येनंतर पोलिसांनी संशयित शार्प शूटर्सला (Sharp Shooter) ताब्यात घेतले. यामध्ये पुण्यातील संतोष जाधव (Santosh Jadhav) याला याप्रकरणी अटक केली. पोलिसांनी संतोष जाधव (Santosh Jadhav) याच्या प्रकरणात केलेल्या तपासात त्याने व त्याच्या मित्रांनी हरियानातील (Haryana) अंबाली छावणी येथील वेश्या व्यवसायावर पिस्तुलाचा धाक (Pistol) दाखवून लुटमार केली होती, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. संतोष जाधव, सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल (Siddhesh Kamble alias Saurabh Mahakal), नवनाथ सुर्यवंशी (Navnath Suryawanshi) यांनी गुन्हेगारीतून कमावलेल्या मालमत्तेचा पुणे ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.

 

संतोष जाधव (Santosh Jadhav), सौरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना ग्रामीण पोलिसांनी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर (Special Judge of Mocca Court S.R. Navander) यांच्या न्यायालयात आज (सोमवार) हजर केले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये 27 जूनपर्यंत वाढ केली. त्यांचा आणखी एक साथीदार तेजस कैलास शिंदे (Tejas Kailas Shinde) याला रविवारी अटक करण्यात आली आहे.

 

मोका विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर (Moka Special Public Prosecutor Pramod Bombatkar) यांनी सांगितले की, संतोष जाधव याने दिलेली पिस्तुल वैभव तिटकारे (Vaibhav Titkare) याच्याकडे मिळाली आहे. हे पिस्तुल मध्यप्रदेशातील जॅक स्पॅरो (Jack Sparrow) नावाच्या व्यक्तीने मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन स्वतंत्र पथक गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात गेले होते. विक्रम ब्रार (Vikram Brar) याने संतोष जाधव व प्रशांत सिंग राजपूत यांना मध्य प्रदेश येथे दोन पिस्तुल व दारुगोळा आणण्यास पाठवलं. त्यापैकी एका पिस्तुलाचा वापर नारायणगाव येथील गुन्ह्यात केल्याची कबुली संतोष जाधवने दिली. तो मुंबई, चंदीगड, सिकर, दिल्ली, गांधीधाम, मांडवी, जोधपूर, अजमेर, पंजाब या ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या सदस्यांकडे राहिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

संतोष जाधव याने अंबाला छावणीत लुटमार केल्यानंतर महाकाल याच्याकडे दहा हजार रुपये देऊन
ते त्याचा भाऊ विशाल जाधव याला पाठवायला सांगितले होते.
1 जून 2022 रोजी नवनाथ सूर्यवंशी याचा महाकाल याला फोन आला होता. त्याने काम झालं आहे.
साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत. तू अकाउंट नंबर दे, त्यावर पाठवेल, असे सांगितले होते. संतोष गुजरातमध्ये असल्याचे सांगितले होते.

 

Web Title :- Santosh Jadhav | Gangstar santosh jadhav lived with lawrence bishnoi gang members in 9 places in the country

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा