‘स्टार डान्सर’ सपना चौधरीच्या ब्राईडल लुकची सोशलवर ‘चर्चा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हरियाणवी डान्सर, सिंगर आणि बिग बॉस स्पर्धक तसेच एक बॉलिवूड स्टार सपना चौधरी नेहमीच आपल्या ठुमक्यांमुळं चर्चेत असते. अलीकडेच सपना चौधरी आपल्या एका फोटोशुटमुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सपनाचा खास ब्राईडल लुक सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

सपना चौधरीनं तिच्या इंस्टावरून तिचे फोटोशुटमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं सिल्वर कलरच लहंग घातला आहे. या ड्रेससोबत तिनं ज्वेलरीही कॅरी केली आहे. चाहत्यांनाही सपनाचा हा ब्राईडल खूपच भावला आहे असं दिसत आहे.

अनेकांना माहिती नसेल की, बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली सपना केवळ स्टेज शोच नाही करत तर ती मॉडेलिंगही करत असते. अनेकदा तिनं आपले मॉडेलिंगचे फोटो सोशलवर शेअर केले आहेत. अनेकदा सपना चौधरी वेस्टर्न लुकमध्येदेखील दिसते. तिचा हा वेस्टर्न अंदाज चाहत्यांनाही खूप आवडतो.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.