ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये सारा, फॅन्स करू लागले आई अमृता सिंहशी तुलना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री सारा अली खानने इंडस्ट्रीच्या काही वर्षातच लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. सारा अली खानशी लोक यासाठी सुद्धा रिलेट करतात कारण तिचा चेहरा मोठ्या प्रमाणात तिची आई आणि बॉलीवुड अभिनेत्री अमृता सिंहशी मिळता-जुळता आहे. सारा अली खानने अलिकडेच आपले काही फोटो शेयर केले आहेत, ज्यामध्ये तिचा गेटअपसुद्धा आईशी मिळता-जुळता दिसत आहे.

सारा अली खानने इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये ती ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने मनीष मल्होत्राच्या नव्या कलेक्शनसाठी हे फोटोशूट केले आहे. नूरानियत 2021 कलेक्शन अंतर्गत सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर वायरल आहेत, ज्यामध्ये ती ब्लॅक अँड सिल्वर आऊटफिटमध्ये दिसत आहे.

मिनिमम मेकअपसह छायाचित्रात सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे अभिनेत्रीची नोज रिंग, जी तुम्हाला तिची आई अमृता सिंहची सुद्धा आठवण करू देऊ शकते. तिने वन पीस ज्वेलरी घातली आहे आणि सोबत लार्ज नोज रिंग सुद्धा घातली आहे.

अशीच नोज रिंग अमृता सिंहने सुद्धा आपल्या लग्नात घातली होती. दोघींच्या नोज रिंगमध्ये खुप सिमिलॅरिटी आहे. सारा आणि अमृताचा चेहरा तर मिळता-जुळता आहेच सोबतच दोघींचा फॅशन सेंससुद्धा कधी-कधी मॅच होतो. आणि जेव्हा असे होते तेव्हा फॅन्स दोघींच्या सुंदर बाँडिंगचे भरपूर कौतूक करतात.

साराने या फोटोंसह कॅपशनमध्ये लिहिले आहे – तुमचे डोळे तुमच्या अंतर आत्म्यापर्यंत पोहचण्याचा दरवाजा आहेत. साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि फॅन्स यावर हार्ट इमोजीसुद्धा शेयर करत आहेत.