Sara Ali Khan | कंजुस सारा अली खानने खरेदी केले मुंबईमध्ये कोट्यावधी रुपयांचे ऑफिस; सर्वजण अवाक

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची क्युट अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या खास अदांनी चाहत्यांना घायाळ करते. सारा ही नेहमी तिच्या लाईफ अफडेट सोशल मीडियावर शेअर करते. अनेक कार्यक्रमांमध्येही सारा अली खान ही तिचे सर्व सिक्रेट सांगत असते. सारा अली खान ही नेहमी ती किती कंजुस आहे व पैसे किती वाचवून खर्चे करते याबाबत सांगत असते. सारा (Sara Ali Khan) पैसे घालवायला अजिबात आवडत नाही हे ती सांगत असते. नुकतेच तिने एक मुंबईमध्ये ऑफिस खरेदी (Sara Ali Khan New Office) केले असून तिच्या ऑफिसची किंमत ऐकून अनेकांनी (Sara Ali Khan Property) आश्चर्य व्यक्त केले आहे.

सारा अली खान ही मागच्या आठवड्यात आई अमृता सिंहबरोबर (Amrita Singh) वांद्रे येथील एका ऑफिसच्या जागेला भेट देताना स्पॉट झाली होती. यावेळी तिला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले होते. मायलेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता साराने अंधेरीमध्ये नव्या ऑफिससाठी (Sara Ali Khan Andheri Office) जागा घेतली असल्याचे समोर आले आहे.एका रिपोर्ट्सनुसार, सारा अली खानने लोटस सिग्नेचरमध्ये (Sara Office In  Lotus Signature) कार्यालयासाठी नवीन जागा विकत घेतली आहे. लोटस सिग्नेचर ही जागा निर्माता आनंद पंडित (Anand Pandit) यांची मालकीची आहे. ‘एका रिअल इस्टेट वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार साराने विकत घेतलेल्या नव्या ऑफिसची किंमत 1.01  कोटी ते 1.46 कोटीच्या दरम्यान असू शकते.

‘लोटस सिग्नेचर’चे बांधकाम सध्या सुरु असून डिसेंबर 2025 सालापर्यंत साराला तिचा ऑफिसचा ताबा मिळू शकतो. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)  ही नेहमी चर्चेत असते. तिने अभिनयाच्या बळावर बॉलीवुडमध्ये (Bollywood News) वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2018 साली तिने अभिनेता सुशांत सिंग रजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या सोबत ‘केदारनाथ’ चित्रपटामध्ये (Kedarnath Movie) स्क्रीन शेअर करत दमदार पदार्पण केले.

त्यानंतर ती सिंबा (Simba), लव आज कल (Love Aaj Kal), अतरंगी रे (Atrangi Re) या सारख्या सिनेमांमध्ये झळकली. सारा अली खानचा नुकताच ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामधील अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) व अभिनेत्री सारा अली खान यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. सारा अली खानचा मेट्रो इन दिनों (Metro In Dino) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Landslide on Rajgad | किल्ले राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या
रस्त्यावर दरड कोसळली, पुरातत्व विभागाकडून बालेकिल्ला काही दिवस बंद

Police Death Due To Heart Attack | दुर्दैवी! पुरग्रस्तांना मदत करताना
पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू