Police Death Due To Heart Attack | दुर्दैवी! पुरग्रस्तांना मदत करताना पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Police Death Due To Heart Attack | गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे (Maharashtra Heavy Rains) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे उरण पोलीस ठाण्यात (Uran Police Station) कार्य़रत असणारे सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे (API Vishal Rajwade) यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू (Police Death Due To Heart Attack) झाला. विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पूरग्रस्तांना (Flood Victims) मदत करत होते.

चिरनेर भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. स्वत: फिल्डवर उतरुन विशाल राजवाडे हे पुरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू (Police Passed Away) झाला आहे. विशाल राजवाडे यांच्या दुर्दैवी मृत्यूने पोलीस दलात (Maharashtra Police) हळहळ व्यक्त होत आहे. मदतकार्य सुरु असताना राजवाडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना डॉक्टरकडे नेले. त्यानंतर राजवाडे यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

पोलीस परिवार या संस्थेने (Police Parivar Organization) हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे नेला.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे (Navi Mumbai CP Milind Bharambe)
यांना फोन केला. विशाल राजवाडे यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे.
जेवढे शक्य असेल तेवढी मदत या कुटुंबियांना करा.
तसेच अनुकंपतत्वावर कुटुंबीयांतील व्यक्तीला घेण्यात येऊ शकते का? यासाठी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
झालेली ही घटना वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Sunil Kendrekar | ‘…तर सुनील केंद्रेकरांवर गुन्हा दाखल करा’, संजय शिरसाट यांची मागणी