Landslide on Rajgad | किल्ले राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली, पुरातत्व विभागाकडून बालेकिल्ला काही दिवस बंद

वेल्हे/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Landslide on Rajgad | वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड येथे बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे दगड निसटले असून याठिकाणी दरड कोसळल्याची घटना शनिवारी (दि.22) घडली आहे. सुदैवाने या मार्गावर पर्यटक नसल्याने मोठी दुर्घटना घडली नसली तरी किल्ल्याच्या धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी (Landslide on Rajgad) काळजी घ्यावी असे आवाहन पुरातत्व विभागाकडून (Department of Archaeology) करण्यात आले आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून राजगड परिसरात संततधार (Landslide on Rajgad) पाऊस सुरु असल्याने ठिसुळ झालेल्या कड्यच्या दगडी उन्मळून कोसळण्याचा धोका असल्याने सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाने बालेकिल्ला काही दिवस पर्यटकांसाठी बंद केला आहे. गडाच्या पद्मावती माचीवरील छत्रपती शिवरायांच्या राजसदरे समोरून जाणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मार्गावर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे.

विकेंडला राजगडावर आठ ते दहा हजार पर्य़कटांची गर्दी होत असते. पहाटेच्या सुमारास बालेकिल्ल्याच्या उंच कड्याचा महाकाय दगड कोसळला. दगडाबरोबर कड्याच्या उन्मळून आलेल्या दरडीची माती,
राडारोडा वाहत खाली आल्याने झाडे झुडपे जमीनदोस्त झाली आहेत.
मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने पायी मार्ग राड्यारोड्या खाली बुजुन गेला आहे.

दुर्गम राजगड, तोरणा गड (Torna Fort), सिंहगडावर (Sinhagad) पावसाळी पर्य़टनासाठी (Monsoon Tourism)
अनेक पर्य़टक गर्दी करत आहेत. पायी मार्गावर तसेच घाट रस्त्यासह गडाच्या डोंगर, कड्याच्या ढिसुळ झालेल्या
दरडी पावसामुळे कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे पर्य़टकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी,
असे आवाहन पुरातत्व विभागासह हवेली आणि वेल्हे पोलिसांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Sunil Kendrekar | ‘…तर सुनील केंद्रेकरांवर गुन्हा दाखल करा’, संजय शिरसाट यांची मागणी