‘असं’ घटवलं सारा अली खाननं आपलं वजन ! थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिलं ‘प्रोत्साहन’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सारा अली खान वेगानं पुढे येणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अलीकडेच सारानं तिचा क्लासिकल डान्सवाला व्हिडीओ शेअर करत दाखवून दिलं होतं की, त्यात ती किती तरबेज आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सारानं तिच्या डान्सवर फोकस करणं सुरू केलं आहे. नुकताच तिनं आणखी एका डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. साराचा हा वर्कआऊट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

सारा अली खाननं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सारा वर्कआऊट करताना दिसत आहे. हा साराचा एक थ्रोबॅक व्हिडीओ आहे. साराच्या चाहत्यांना हा व्हिडीओ मात्र खूप आवडला आहे. चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलेब्सही तिची निष्ठा पाहून इम्प्रेस झाले आहेत. व्हिडीओ सारा पुलअप्स मारताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास मोटिवेशनल कॅप्शनही दिलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.