सारा अली खानचा ‘वर्कआऊट’ करतानाचा व्हिडिओ पाहून लोकांना फुटला घाम, फॅन्स म्हणाले – ‘एकदम कडक’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान खूपच फिटनेस फ्रीक आहे. सारा नेहमीच हेल्दी लाइफस्टाइलला खूप महत्त्व देते. सारा बर्‍याचदा जिमच्या बाहेर स्पॉट होताना दिसते. साराचे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता साराचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने तिचे चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.


साराच्या वर्कआउट व्हिडिओने फॅन्स इम्प्रेस –
साराने अलीकडेच तिचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती वेट लिफ्टिंग करताना तसेच तिच्या प्रशिक्षकासह बॉक्सिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सारा व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्स परिधान केले आहेत. साराच्या फिटनेस व्हिडिओमुळे चाहते खूपच प्रभावित झाले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये तिचे कौतुक करीत आहेत. एकाने तिच्या व्हिडिओवर एक दम कडक अशी कमेंट केली आहे.

साराचे फिल्मी करिअर
साराने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. केदारनाथ या फिल्ममधून डेब्यू करणारी सारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत लव्ह आज कलमध्ये दिसणार आहे. याशिवाय सारा वरुण धवनसोबत कुली नंबर वनमध्येही काम करत आहे.


वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चेत सारा
प्रोफेशनल लाइफबरोबरच सारा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत राहिली आहे. कार्तिक आर्यनसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे साराचे नाव चर्चेत असते. आता कार्तिक आर्यनसोबत डेटिंगच्या बातम्यांदरम्यान, साराच्या कार्तिकबरोबर ब्रेकअप झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वृत्तानुसार, दोघांनीही एकमेकांच्या संमतीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोघेही एकमेकांशी मैत्रीचे नाते कायम ठेवतील.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like