Sara Sachin Tendulkar | लंडनला परतली सारा तेंडुलकर, पोस्ट केले खास छायाचित्रं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा नियमितपणे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात. साराचे इन्स्टाग्राम (Instagram) वर 1.7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (Sara Sachin Tendulkar)

 

सारा तेंडुलकर पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. साराने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली आहे. फोटो शेअर करताना साराने लिहिले की, तीन वर्षांनंतर हिवाळ्यात लंडनमध्ये परतणे खूप छान आहे.

 

Sara Tendulkar

 

सारा तेंडुलकरने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (Dhirubhai Ambani International School) मधून शिक्षणाला सुरुवात केली होती. त्यानंतर ती लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज (University College, London) मधून वैद्यकीय शिक्षण घेत आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्यात अफेअर (Affair) असल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत, पण दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही. (Sara Sachin Tendulkar)

 

शुभमनचे नाव शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलीसोबतही जोडले गेले होते. गेल्या महिन्यात सारा तेंडुलकर गोव्यात सुट्टी घालवताना दिसली होती. गोव्यातील अनेक फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. गोवा दौर्‍यापूर्वी सारा तेंडुलकर हैद्राबादला सुद्धा गेली होती. येथे ती ताज फलकनुमा पॅलेसमध्ये गेली होती.

Sara Tendulkar

 

सारा तेंडुलकरने अलीकडेच अ‍ॅड फिल्ममध्ये पदार्पण केले आहे. तिने एका कपड्याच्या ब्रँडसाठी इंस्टाग्रामवर जाहिरात शूट केली होती. सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) सतत तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. गेल्या वर्षी सारा तेंडुलकरने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासोबत खास डिनर केले होते. साराचे वडील सचिन तेंडुलकर यांनी हा फोटो शेअर केला आहे.

 

 

साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकर (Arjun Sachin Tendulkar) बद्दल सांगायचे तर,
त्यालाही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भारताची जर्सी घालायची आहे.
अर्जुन तेंडुलकरही IPL लिलावाचा भाग असणार आहे. मेगा लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईस 20 लाख रुपये आहे.
त्याला अनकॅप्ड ऑलराऊंडरच्या यादीत स्थान मिळाले आहे.

 

 

गेल्या वर्षीही अर्जुन तेंडुलकरची बसे प्राईस 20 लाख रुपये होती.
त्यानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या क्रिकेटपटूला त्याच किमतीत संघात घेतले होते.

 

Web Title :-  Sara Sachin Tendulkar | sara tendulkar arrives in london share beautiful pictures sachin tendulkar daughter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lata Mangeshkar Memorial | लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्क येथे नाही तर ‘या’ ठिकाणी होणार, राज्य सरकारने केली घोषणा

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7142 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य योजनांचे ऑडीट करणार – पुणे मनपा स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने