Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7142 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्या कमी होत आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या लाखाच्या आत आल्याने दिलासा मिळाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 7 हजार 142 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात एकही ओमायक्रॉन (Omycron) बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.

 

राज्यात आज 20 हजार 222 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 75 लाख 93 हजार 291 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.06 टक्के झाले आहे. राज्यात आज 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजपर्यत राज्यात 1 लाख 43 हजार 247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 59 लाख 05 हजार 676 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 23 हजार 385 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 82 हजार 893 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 05 लाख 78 हजार 076 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Comfortable! State recovery rate at 97%, 7142 new corona patients in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या मिळकत करात यंदा वाढ नाही

 

Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य योजनांचे ऑडीट करणार – पुणे मनपा स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने

 

Uday Samant | पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण 14 फेब्रुवारीला होणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती (व्हिडिओ)