काय सांगता ! होय, बाजारात आल्या कंगना रनौतचा फोटो असलेल्या साड्या, ‘समर्थनार्थ’ आला गुजरातमधील ‘व्यापारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांत कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या संघर्षाचा संपूर्ण देश साक्षीदार आहे. कधी कंगनाने शिवसेनेवर हल्ला केला तर कधी शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांनी कंगनावर जोरदार टीका केल्या. जेव्हा बीएमसीने कंगनाचे मुंबई कार्यालय तोडले तेव्हा ही बाब वाढली. त्यामुळे आता कंगना महाराष्ट्र सरकारशी अटी तटीवर उतरली आहे.

एका बाजूला कंगनाला बॉलिवूडच्या अनेक स्टार्सचा पाठिंबा मिळाला तर दुसरीकडे तिला देशभरात पसरलेल्या तिच्या कोट्यवधी चाहत्यांचा पाठिंबाही मिळत आहे. सुरतच्या एका मोठ्या कापडाच्या व्यापाऱ्याने कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचे पोस्टरही कंगनाला पाठिंबा देण्यासाठी वापरलेले आहे आणि साडीच्या पदरावर ‘आय सपोर्ट कंगना रनौत’ असंही इंग्रजीत लिहिलं आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सूरत कापड व्यापारी पुरुषोत्तम झुंझुनवाला उर्फ छोटू भाई म्हणाले, ‘अभिनेत्री कंगना रनौतला कसा त्रास दिला जात आहे, हे संपूर्ण देश पहात आहे, आणि तरीही कंगना ठाम आहे. आमचे काम स्त्रियांसाठी साड्या बनविणे आणि विक्री करणे आहे, त्यामुळे आम्हाला असेही वाटले आहे की आपण देखील कंगनाला साथ दिली पाहिजे. म्हणून, कंगनाला पाठिंबा देऊन आम्ही एक छापील साडी बनवली आहे.

पुरुषोत्तम पुढे म्हणतात, “सध्या, या साड्या परवा बनवून तयार झाल्या आहेत. परंतु ज्या प्रकारे दुकानदारांना याबद्दल उत्सुकता आहे, आम्हाला वाटते की काही दिवसांत त्याची मागणी नक्कीच वाढेल, त्याबद्दल आम्हीही उत्सुक आहोत. बाकी बाजारात साड्या किती विकल्या जातील हे येणारा काळच ठरवेल.’

ते पुढे म्हणाले, ‘माझी कंगनाशी कधीही चर्चा झाली नाही. पण मला आजतक च्या माध्यमातून कंगनाला सांगायचे आहे की मला ही साडी कंगनाला माझ्या स्वत:च्या हातानी गिफ्ट करायची आहे आणि हेही सांगायचे आहे की संपूर्ण देश तुमच्या पाठिंब्यात आहे आणि यात काही शंका नाही.’

कंगना आणि शिवसेना यांच्यातील मतभेदांदरम्यान कंगनाला करणी सेनेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेदी यांनी अभिनेत्री कंगना रनौतची मुंबई येथे भेट घेतली. कंगना रनौत रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी 4.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत कंगना रनौत राज्यपालांसमोर आपले कार्यालय पाडण्याचे आणि पालिकेच्या सुरक्षेबाबत आपले मत मांडू शकते.

मुंबई कार्यालयातील तोडफोड झाल्यापासून कंगना रनौत खूप रागावली असल्याची माहिती आहे आणि उद्धव सरकारवर सतत हल्ला करत आहे. तिने ट्विटरवर शिवसेनेला लक्ष्य केले आणि ते म्हणाली की आज माझे कार्यालय तुटले आहे, उद्या तुमचा अभिमान तुटेल. आता ही बाब शांत होते की ती आणखी पुढे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.