सरकारी नोकरी ! AAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1 लाखापेक्षा जास्त वेतन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (AAI) कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. या पदावर बीई किंवा बीटेक केलेल्या उमेदवारांबरोबरच 2019 मध्ये गेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छूक उमेदवार AAI च्या अधिकृत संकेतस्थळ www.aai.aero वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात.

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक (अधिकारी)

पदांची संख्या –  180

वेतनश्रेणी –  40000 – 14000/- रुपये

शैक्षणिक पात्रता – भारतातील मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत बीई किंवा बीटेक, गेट 2019 मध्ये चांगले गुण

वयोमर्यादा –  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 27 वर्षे आहे. वयोमर्यादा 09 सप्टेंबर 2020 पासून ग्राह्य धरली जाईल.

अर्ज फी – सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी 300 रुपये आहे. एससी/एसटी/ईडब्ल्यूएस/पीडब्लूडी/महिला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. नेट बँकिंग, डेबीट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे फी भरली जाऊ शकते.

ऑनलाईन अर्जाची सुरुवात – 3 ऑगस्ट 2020

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 2 सप्टेंबर 2020

अर्ज प्रक्रिया – या पदांचे अर्ज ऑनलाईन भरले जातील. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाईटवर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करु शकतात.