Satara Accident News | विहिरीत क्रुझर कोसळून अपघात; प्रवाशांचा शोध सुरूच

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Accident News | गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत (Guhagar-Bijapur National Highway) पाटण तालुक्यातील विहे गावच्या हद्दीत क्रुझर जीप (Cruiser Jeep) विहिरीत पडल्याची (Satara Accident News) घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजता घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी जीप पाण्याने भरलेल्या विहिरीत पडताना पाहिल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्यांनी बचावकार्य सुरू ठेवले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, विहे गावच्या हद्दीत गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गापासून शंभर फुटावर विहीर आहे. या विहिरीला सुरक्षा कठडे नाहीत. मंगळवारी सायंकाळी कराडहून पाटणच्या दिशेने निघालेली एक भरधाव जीप महामार्गावरून थेट त्या विहिरीत कोसळली (Satara Accident News). ही घटना काही प्रवाशांनी पाहिल्यावर या अपघाताबाबतची माहिती परिसरातील ग्रामस्थांना तसेच पोलिसांना देण्यात आली. मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे (Malharpeth Police Station) अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, पावसाच्या रिपरिप मुळे बचाव कार्यात पोलिसांना अडथळे येत होते. रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू होते. विहिरीतील पाणी कमी झाल्यानंतर जीप क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढली. यावेळी पोलिसांना मृतदेह (Dead Body) आढळून आला. ओळख पटवली असता तो मृतदेह संभाजी पवार (Sambhaji Pawar) यांचा असल्याचे समजते. पवार हे या वाहनाचे मालक असून ते स्वत: गाडी चालवत असल्याची मल्हारपेठ पोलिसांकडून माहिती दिली. मात्र, जीपमध्ये एकही प्रवासी आढळला नसल्याने विहिरीत शोध घेण्यात येत आहे.

Web Title : Satara Accident News | satara cruiser jeep falls in well on guhagar vijapur national highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा