Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात दाखल झालेला सातारा जिल्ह्यातील जवान शहीद

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Jawan Martyred | सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील तीन महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या जवानाला वीरमरण आले आहे. प्रथमेश संजय पवार (Prathamesh Sanjay Pawar) हे कर्तव्यावर असताना झालेल्या चकमकीत रात्री 10.30 च्या सुमारास वीरमरण आले आहे. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर (Jawali taluka) शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई – वडील एक भाऊ असा परिवार आहे.

 

सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच प्रथमेश यांनी बघितले होते. ते स्वप्न त्यांनी अखेर पुर्ण केले. प्रथमेश संजय पवार हे 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात भरती झाले होते. अवघ्या 22 व्या वर्षी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान (Satara Jawan Martyred) दिले आहे. त्यांचे पार्थिव रविवारी बामनोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

19 मे रोजीच्या रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात (Jammu Samba Block Campus) ड्युटीला होते.
त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना प्रथमेश यांना गोळी लागली.
यामध्ये ते गंभीर जखमी (Seriously injured) झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
याची माहिती त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

Web Title :- Satara Jawan Martyred | satara jawan prathamesh pawar son of bamnoli of satara martyred while fighting terrorists in jammu

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा