भीषण अपघातात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – बुलेट आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍याचा मृत्यु झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मानेगावच्या हद्दीतील कराड-ढेबेवाडी मार्गावरील पुलाजवळ घडली आहे. विशाल सुनिल मोरे (25) असे अपघातात मृत्यु झालेल्याचे नाव आहे.

विशाल मोरे हे बुलेटवरून कराडहुन तळमावलेच्या दिशेने जात होते. त्याचवेळी कार कराडच्या दिशेने जात होते. एस कॉर्नरवर कारने विशाल यांच्या बुलेटला धडक दिली. कार भरधाव असल्याने विशालच्या बुलेटचे इंजिन चक्‍काचुर झाले. अपघातात गंभीर जमखी झालेल्या विशाल यांना तात्काळ कराड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार चालु करण्यात आले. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन कारचालकाविरूघ्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशाल मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. अत्यंत मनमिळावु स्वभावाच्या विशाल यांच्या अपघाती मृत्युने परिसरातुन हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.