Satara Police | लाच प्रकरणी सातारा पोलीस दलात खळबळ, सहायक पोलीस उपनिरीक्षकाची पदावनती करुन पुन्हा केलं हवालदार

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – लाच प्रकरणी (Bribery case) अनेक कारवाया करण्यात येतात. तसेच शिक्षा देखील सुनावली जाते. मात्र, पैसे मागितल्या प्रकरणी दोन वर्षासाठी पदावनती (Demotion) केल्याचे प्रकरण सातारा पोलीस दलात (Satara Police) घडले आहे. साताऱ्यातील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या (Gurukul Education Institute) केस प्रकरणात पैसे मागून त्रास दिल्या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के (Assistant Sub-Inspector of Police Vijay Shirke) यांची दोन वर्षांसाठी पदानवती करुन त्यांना पुन्हा हवालदार (Constable) करण्यात आले आहे. या घटनेमुळे सातारा पोलीस दलात (Satara Police) प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

सातारा शहरातील उद्योजक राजेंद्र चोरगे (Entrepreneur Rajendra Chorge) यांच्या गुरुकुल शाळेच्या मालकी हक्कावरुन मागील चार वर्षांपासून वाद होता. यातून चोरगे यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर अटक (Arrest) न करण्यासाठी आणि केसमध्ये मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) विजय शिर्के यांनी पैशांची मागणी (Demand Money) केली. याबाबत तक्ररदार राजेंद्र चोरगे यांनी रेकॉर्डिंग करुन ते पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) सादर केले. तसेच शिर्के विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलीस खात्यांतर्गत चौकशी झाल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांची पदावनती करण्यात आली.

विजय शिर्के यांच्यावर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Satara SP Ajay Kumar Bansal) यांनी ही कारवाई केली.
शिर्के यांनी तक्रारदार यांच्याकडे 12 लाखाची मागणी केली होती.
त्यापैकी 6 लाख घेतल्याचे शिर्के याने कबुल केल्याचे रेकॉर्डिंग मध्ये आहे.
या घटनेमुळे सातारा पोलीस दलात (Satara Police) खळबळ उडाली आहे.
याप्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लक्ष घालावे अशी मागणी तक्रारदार राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.

Web Title :- Satara Police | assistant sub inspector of police demoted for 2 years as constable satara police news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

ACB Trap On Police Inspector In Maharashtra | लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघे ‘लाच लुचपत’च्या ‘जाळ्यात’