Birthday Special : १ वर्षात ‘५०’ वेगवेगळ्या भूमिका साकारुन प्रसिद्ध झाला ‘हा’ अभिनेता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजही आपल्या जबरदस्त कॉमिक टाइमिंगसाठी प्रसिद्ध असणारा अभिनेता सतीश शाह यांचा आज वाढदिवस आहे. आज ते ६८ वर्षाचे झाले आहेत. त्यांचा जन्म २५ जून १९५१ साली गुजरातमध्ये झाला. सतीश शाह यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना टिव्ही सीरीयलमधून प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात दुरदर्शनवर येणारी सीरीयल ‘ये जो है जिंदगी’ पासून केली. यानंतर त्यांनी १ वर्षामध्ये ५० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची सगळ्या भूमिका चाहत्यांना खूप पसंतीस पडल्या होत्या.

त्याचवेळी, सतीश शाहने ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेला त्याच्या करिअरसाठी एक मौलाचा दगड मानला. आपण त्यांना शेवटी ‘हमशकल्स’ चित्रपटामध्ये पाहिले होते. त्यांनी या चित्रपटामध्ये वाय.एम राजची भूमिका साकारली होती. त्यांच्या व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, रितेश देशमुख, राम कपूर, बिपाशा बसु, तमन्ना भाटिया आणि ईशा गुप्ता यांनी देखील मुख्य भूमिकेत काम केले होते. सतीश शाह यांनी १९७२ मध्ये मधु शाह यांच्यासोबत लग्न केले होते. सतीश शाह यांचा पहिला चित्रपट ‘अरविंद देसाई की अजीब दास्तां’ १९७८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

यानंतर सतीश यांनी ‘जाने भी दो यारों’ (1983), परम धरम (1987), वीराना (1988) अंजाम (1989) सारख्या चित्रपटात काम देखील केले होते. चित्रपटा व्यतिरिक्त सतीश यांनी महशूर धारावाहिक ‘साराभाई Vs साराभाई’, ऑल द बेस्ट, नहले पे दहला सारख्या शोमध्ये देखील काम केले होते. यासोबतच ते प्रसिद्ध ‘कॉमेडी सर्कस’ शो चे जज देखील बनले होते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक