फायद्याची गोष्टी ! नववर्षात ‘या’ 4 पर्यायांमध्ये गुंतवणूक करा अन् मिळवा जास्तीत जास्त पैसे

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षी चांगली गुंतवणूक करायची असेल तर आतापासूनच सुरुवात करा. नव्या वर्षाच्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय तुमच्यासमोर असणार आहेत मात्र यामधून योग्य पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे. 2020 मध्ये तुम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी या बाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. डेट फंड
डेट फंड फिक्स डिपॉझीटच्या तुलनेत जास्त टॅक्स रिटन देतात यामध्ये जरुरत पडल्यास तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. फिक्स्ड डिपॉजिट प्रमाणे डेट फंड देखील अनेक पर्याय देतो. यामध्ये तुम्ही एका दिवसापासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही केवळ पंधरा दिवसांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर ओवरनाइट फंड सर्वात चांगला पर्याय आहे. 15 दिवस ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. यानुसार कालावधीप्रमाणे वेगवेगळे पर्याय यामध्ये गुंतवणुकीसाठी दिलेले आहेत.

2. इक्विटी म्यूचुअल फंड
महागाईपासून वाचून जर गुंतवणूक करायची असेल तर हा पर्याय चांगला आहे. आर्थिक धोरणकर्त्यांचे म्हणणे आहे की, आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी गुंतवणूकीचे प्रमाण तुमच्या वयमानानुसार 100 पेक्षा कमी असावे. उदाहरणार्थ, जर आपले वय 30 वर्षे असेल तर आपण आपल्या 100% मालमत्तेपैकी 30 वजा 70% इक्विटीमध्ये गुंतवावे. जसे जसे आपण वयस्कर होता, हळूहळू इक्विटीमधील आपला धोका कमी करा.

3. गोल्ड (सोन)
गोल्ड हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. अधिक कालावधीसाठी इक्विटी पेक्षा अधिक फायदा यामध्ये होत नाही. तरीही गोल्ड ही एक सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. यामुळेच लोक आर्थिक मंदी दरम्यान सोन्यात गुंतवणूक करतात.

4. रियल इस्टेट
हा भारतीयांचा सर्वात आवडतीचा गुंतवणूक पर्याय आहे. नियमित भाडे मिळावे यासाठी जर तुम्ही या पर्यायामध्ये गुंतवणूक करणार असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. आपत्कालीन कर्जासाठी देखील ही प्रॉपर्टी गहाण ठेवता येऊ शकते. तसेच तुम्ही रियल इस्टेट कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता परंतु यात मोठ्या प्रमाणावर धोका आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/