31 जुलै पूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही ‘कर’ माफीचा ‘लाभ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या साथीमुळे सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षात कर सवलतीचा लाभ मिळण्यासंदर्भात कर बचत योजनेतील गुंतवणूकीची मुदत वाढविली होती. हा कालावधी 31 जुलै रोजी संपत आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2018-19 (AY 2019-20) साठी मूळ फाइल आणि तसेच सुधारित आयटीआर दाखल करण्याची मुदतही वाढविली होती.

अधिक माहिती म्हणजे आर्थिक वर्ष 2019-20 (AY 2020-21) साठी प्राप्तिकर परताव्याची देय तारीख 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त गुंतवणूक, बांधकाम, लाभाचा दावा करण्यासाठी खरेदीची तारीख, आयटी कायद्याच्या कलम 54 ते 54 जीबी अंतर्गत भांडवली नफ्याच्या संदर्भात 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

अंतिम मुदत 31 जुलै रोजी कालबाह्य होत आहे
आर्थिक वर्ष 2018-19 (AY 2019-20) साठी मूळ तसेच सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 रोजी संपणार आहे. तसेच कलम 80सी (एलआयसी, पीपीएफ, एनएससी इ.), 80डी (मेडिक्लेम), 80जी (देणगी) अंतर्गत आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयकर कपात दावा करण्यासाठी विविध गुंतवणूक/ पेमेंट करण्याची मुदत 31 जुलै 2020 आहे.

कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत एनपीएसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही 50,000 अतिरिक्त कर कपातीचा दावा देखील करू शकता. आर्थिक वर्ष 2019-20 साठी या कलमांतर्गत कपात करण्याचा दावा करण्यासाठी 31 जुलै 2020 पर्यंत गुंतवणूक करता येईल. सरकारने कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सुकन्या समृध्दी खाती उघडण्यासाठी पात्रतेच्या निकषात काही सवलतीची घोषणा केली होती. सुकन्या समृद्धी खाते 31 जुलै 2020 रोजी किंवा त्यापूर्वी मुलींच्या नावे उघडता येईल, ज्यांनी 25 मार्च 2020 ते 30 जून 2020 पर्यंत या लॉकडाऊन कालावधीच्या दरम्यान 10 वर्षे पूर्ण केली असतील.