Sawai Gandharva Bhimsen Festival | यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 14 ते 18 डिसेंबर दरम्यान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharva Bhimsen Festival) हा दरवर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यात आयोजित केला जातो. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे (Arya Sangeet Prasarak Mandal) आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक 14 ते 18 डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी (Working President Srinivas Joshi) यांनी दिली आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. यंदाचा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल. याआधीचा महोत्सव डिसेंबर 2019 मध्ये आयोजित करण्यात आला होता.

पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात आपले गुरू सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून 1953 मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला.
गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा,
देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित
करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही,
तर पुण्याच्या नावलौकिक मध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे.
कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते.

 

Web Title :- Sawai Gandharva Bhimsen Festival | This year’s Sawai Gandharva Bhimsen Festival is from 14th to 18th December

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress | अंधेरीतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी

Udayanraje Bhosale | कास महोत्सवाला विरोध करणाऱ्यांना फारसे महत्व देत नाही – उदयनराजे भोसले

CM Eknath Shinde | ‘त्या’ ST कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा ! उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय शिंदे सरकार बदलणार