पुणे : ‘त्या’ शाळेने यंदा संवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास जागा नाकारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील सवाई  गंधर्व भीमसेन जोशी  महोत्सवाचे वेगळेच महत्व आहे. सवाई गंधर्व म्हणजे पुण्याची शान असे म्हणल्यास गैर नाही मात्र पुण्याचा  मान संवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होणार नाही. अशी माहिती समोर आली आहे. शाळेने जागा नाकारल्याने महोत्सवाची जागा बदलणार, पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी माहिती दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca82a9a7-cafc-11e8-b8ea-eddb40b82eaf’]

 गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.

पुण्याचा ब्रँड सवाई  गंधर्व भीमसेन जोशी  महोत्सव

पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d00be583-cafc-11e8-a4d1-dd62519890cd’]

पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात आपले गुरु सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून इ.स. १९५२ मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला. त्यांचे गुरुबंधु पंडित फिरोज दस्तूर आणि गुरुभगिनी गंगुबाई हनगल यांचाही या महोत्सवात पहिल्या वर्षापासून सहभाग होता.

हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), डॉ. वसंतराव देशपांडे व पु.ल. देशपांडे यांचेही सहकार्य लाभले.

महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते. कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे सवाई महोत्सवात अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही. उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळ्या कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले आहे. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले. त्याचप्रमाणे कितीतरी नावे या महोत्सवामुळे रसिकांच्या जवळची झाली.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d5b3ce18-cafc-11e8-a13e-13c0006aa045′]

महोत्सवाची सांगता पूर्वी स्वत: पंडीत भीमसेन जोशी यांच्या गायनाने होत असे. वृद्धापकाळामुळे त्यांनी सादरीकरण थांबवल्यानंतर किराणा घराण्याच्या इतर गायकांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. २००५ साली संगमेश्वर गुरव यांच्या गायनाने उत्सवाची सांगता झाली. २००७ पासून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. उत्सवाची अधिकृत सांगता सवाई गंधर्वांच्या आवाजातील राग भैरवी मधील प्रसिद्ध ठुमरी जमुना के तीर ची ध्वनिमुद्रिका ऐकवून केली जाते.