SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
नवी दिल्ली : SBI ATM | एसबीआय आपल्या ग्राहकांना एटीएम/डेबिट कार्ड (SBI ATM) न वापरता कॅश काढण्याची सुविधा देते. यासाठी बँक योनो कॅशची (YONO Cash) सुविधा देते. याच्या मदतीने तुम्ही एटीएमसह पीओएस टर्मिनल आणि कस्टमर सर्व्हिस पॉईंटवरून (CSP) सुद्धा कॅश काढू शकता.
यासाठी तुमच्या फोनमध्ये एसबीआयचे योनो अॅप (Yono App) असले पाहिजे. या अॅपद्वारे तुम्ही देशात कुठेही एसबीआयच्या एटीएममधून कॅश काढून शकता. या सुविधेद्वारे किमान 500 रुपये आणि कमाल 10,000 रुपये एसबीआय एटीएममधून काढू शकता. (SBI ATM)
एसबीआयच्या ATM वर अवलंबा ही पद्धत
– प्रथम योनो अॅपमध्ये लॉगिन करा.
– नंतर होम पेजवर YONO Cash वर क्लिक करा.
– आता योनो कॅशमध्ये ATM सेक्शनवर क्लिक करा.
– यानंतर आमऊंट एंटर करा.
– आता 6 अंकी एक पिन तयार करा. यानंतर योनो कॅश ट्रांजक्शन नंबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल. तो 6 तासांसाठी व्हॅलिड राहतो.
– ATM वर योनो कॅश ऑपशनवर टॅप करा. यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवलेल्या योनो कॅश ट्रांजक्शन नंबर आणि तुम्ही बनवलेला 6 अंकी पिन टाका. (SBI ATM)
– ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आता कॅश कलेक्ट करू शकता.