World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

नवी दिल्ली : World Diabetes Day 2021 | काही हेल्दी फूडमध्ये फॅट, शुगर आणि कार्बोहायड्रेटची मात्रा खुप जास्त असते, जी शरीरात शुगर लेव्हल वाढवते. डायबिटीजमध्ये या हेल्दी पदार्थांचा शरीरावर उलटा परिणाम होतो, यासाठी ते खाणे टाळले पाहिजे. डायबिटीज प्रति लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबरला ’वर्ल्ड डायबिटीज डे’ सेलिब्रेट (World Diabetes Day 2021) केला जातो. यानिमित्त जाणून घेवूयात कोणत्या हेल्दी फूडपासून डायबिटीज रूग्णांनी दूर रहावे (In diabetes, these 8 healthy foods also have adverse effects on the body, keep it away)…

 

1. तांदूळ :

तांदळात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर आढळते. परंतु सोबतच यामध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा सुद्धा खुप जास्त असते. जी शरीरात शुगर लेव्हल वाढवते. डायबिटीज रुग्णानी नेहमी ब्राऊन राईस खावा.

 

2. केळे :

केळ्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, फायबर, मॅग्नेशियम, इत्यादी भरपूर असते. परंतु यामध्ये नॅचरल शुगरसुद्धा भरपूर असते. कच्च्या केळ्याच्या तुलनेत यामध्ये 16% जास्त शुगर असते. डायबिटीज रुग्णांसाठी हे नुकसानकारक आहे.

 

3. फ्रट ज्यूस :

मार्केटमध्ये मिळणार्‍या ज्यूसमध्ये फायबर आणि न्यूट्रिएंट्सची मात्रा कमी असते आणि त्यामध्ये शुगर असते. यामुळे शरीरात कार्बोहायड्रेटची मात्रा वाढते. यासाठी ताजी फळे चावून खा.

 

4. कॉफी :

कॉफी एनर्जी लेव्हल वाढवते. सोबतच ती फॅट बर्न आणि एकाग्रता वाढवते. यामध्ये रायबोफ्लेविन, पोटॅशियम इत्यादी असते. परंतु शुगर सिरप, शुगर क्युब्ज किंवा क्रीमसह बनवलेल्या कॉफीने शुगर लेव्हल वाढते. यासाठी विना शुगर ब्लॅक कॉफी  प्या.

 

5. फ्लेवर्ड ओट्स :

प्लेन ओट्स खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. ओट्समध्ये खुप फायबर असते आणि ते डायबिटीज कंट्रोल करण्यात मदत करते. परंतु बाजारात अनेक प्रकारचे फ्लेवर्ड ओट्स सुद्धा मिळतात ज्यापासून डायबिटीज रूग्णांनी दूर राहिले पाहिजे.

 

6. मध :

डायबिटीजच्या रूग्णांसाठी मध हे साखरेचा पर्याय मानले जाते पण कधी-कधी हाय शुगर कंटेंटमुळे ते नुकसानकारक ठरू शकते.
शुद्ध मध असेल तरच सेवन करा.

 

7. प्रोटीन बार :

वर्कआऊटच्या अगोदर आणि त्यानंतर प्रोटीन बार खाणे चांगले आहे.
कारण तो शरीराला एनर्जी देतो आणि मसल्स मजबूत करतो.
परंतु यामध्ये कॅलरी, शुगर, कार्ब्ज आणि फॅटची मात्रा भरपूर असते.
फॅट फ्री मिल्कपासून बनवलेला हाय फायबर प्रोटीन बार खाऊ शकता.

 

8. ड्राय फ्रूट :

ड्राय फ्रूट जसे की, मनुके, बदाम, अंजीर इत्यादी डायबिटीजमध्ये नुकसानकारक ठरू शकते.
शक्यत तेवढा याचे सेवन कमी करा. (World Diabetes Day 2021)

 

Web Title :- World Diabetes Day 2021 | world diabetes day 2021 8 healthy foods which have the opposite effect in human body

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा