SBI च्या शेयरमध्ये जबरदस्त तेजी, सप्टेंबर तिमाहीच्या निकालापूर्वी 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचले स्टॉक्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शेयर (Share) ने आज म्हणजे 3 नोव्हेंबरला इंट्राडेमध्ये 1 टक्केपेक्षा जास्त तेजीसह 528.25 रुपयांचा 52 आठवड्याचा उच्चांक गाठला. एसबीआय आजच आपले सप्टेंबर तिमाहीचे परिणाम घोषित करणार आहे.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सप्टेंबर तिमाहीत लोअर क्रेडिट कॉस्ट आणि बॅड लोनसाठी तरतुदीत घट केल्याने SBI बँकेच्या नफ्यात जोरदार वाढ दिसून येईल.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 50-100% पेक्षा जास्त वाढ पहायला मिळू शकते.
परंतु या कालावधीत कंपनीच्या व्याजातून होणार्या कमाईत किरकोळ वाढ होऊ शकते किंवा ती स्थिर राहू शकते.
तर वार्षिक आधारावर लोन ग्रोथ हाय सिंगल डिजिटमध्ये राहू शकते. या कालावधीत तिमाही आधारावर बँकेच्या व्यवहारात तेजी येण्याची अपेक्षा आहे.
केआर चौकसी यांचे म्हणणे आहे की, मार्जिनमध्ये सुधारणा आणि क्रेडिट कॉस्टमध्ये झालेली घट पाहता या गोष्टीची अपेक्षा आहे की, वार्षिक आधारावर SBI च्या नफ्यात चांगली वाढ दिसू शकते.
सोबतच बँकेची लोन ग्रोथसुद्धा वार्षिक आधारावर हाय सिंगल डिजिटवर राहण्याची अपेक्षा आहे.
तर व्याजातून होणार्या कमाईत तिमाही आधारावर चांगली वाढ पहायला मिळू शकते.
केआर चोक्सी यांचे म्हणणे आहे की, या कालावधीत एसबीआयच्या नफ्यात वार्षिक आधारावर 49 टक्के वाढ पहायला मिळू शकते.
तर व्याजाच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 0.5 टक्केची वाढ पहायला मिळू शकते.
Web Title : SBI | sbi touched a 52 week high before the september quarter results know how results can be
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Rains | पुढील 5 दिवस पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, IMD कडून 8 जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट