Maharashtra Rains | पुढील 5 दिवस पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, IMD कडून 8 जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   तामिळनाडू आणि श्रीलंका किनारपट्टी परिसरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने (Maharashtra Rains) हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसांत कोल्हापूरसह दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस (Maharashtra Rains) पडला आहे. यानंतर आता अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy rainfall) पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

 

‘या’ 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट

 

देशात सध्या ईशान्य मोसमी वारे (Northeast monsoon wind) सक्रिय आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. हवामान खात्याने आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर उस्मानाबाद आणि लातूर या 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला (Maharashtra Rains) आहे.

पुढील काही तासात पावसाची शक्यता

 

पुढील काही तासांमध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान वेगाने वारे वाहणार असून हवेचा वेग प्रतितास 30 ते 40 किमी इतका असेल. याशिवाय रायगड (Raigad), पुणे (Pune), अहमदनगर (Ahmednagar) आणि नांदेड
(Nanded) या 4 जिल्ह्यांत देखील आज अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
पुढील काही तासात या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर (Maharashtra Rains) अधिक वाढणार आहे.

 

4 दिवस पुण्यात येलो अलर्ट

 

उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने (IMD) येलो अलर्ट जारी केला आहे.
त्यामुळे पुढील चार दिवस पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची धुवाधार बॅटिंग होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. शनिवार आणि रविवार मुंबई आणि ठाण्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Maharashtra Rains) कोसळणार आहे.

 

चार दिवस जोरदार पाऊस

 

सध्या लक्षद्विप दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे.
पुढील तीन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
तसेच लक्षद्विप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे.
याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | heavy rainfall alert to mumbai and pune for next 5 days imd gives red alert to Sindhudurg, Ratnagiri, Satara, Sangli, Kolhapur, Solapur, Osmanabad and Latur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारने 6.5 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये पाठवली दिवाळीची भेट, तात्काळ ‘या’ पद्धतीने जाणून घ्या शिल्लक

PM KISAN | पती-पत्नी दोघेही घेऊ शकतात का पीएम किसान योजनेतून वार्षिक 6,000 रुपये? जाणून घ्या नवीन नियम

Ajit Pawar | ‘आज गडी लय जोरात हाय… जास्त बोलत नाही’; अजित पवारांकडून राजेंद्र पवार यांना ‘कोपरखळी’