Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगतापची ‘गेम’ करण्यास गावठी पिस्तुल पुरवणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दौंड (Daund) तालुक्यातील राहू (Rahu) येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी संतोष जगताप याचा उरुळी कांचन येथे गोळ्या झाडून खून (Santosh Jagtap Murder Case) करण्यात आला. हॉटेल सोनाईमधून (Hotel Sonai) बाहेर पडल्यानंतर दबा धरुन बसलेल्या आरोपींनी संतोष जगातप याच्यावर गोळ्या झाडल्या. या  (Pune Crime) वापरलेली गावठी पिस्तूल (Pistol) पुरवल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. यामुळे या खुनप्रकरणी (Pune Crime) अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

 

अभिजीत सोपान यादव (वय-22 रा. मेडद, ता. बारामती, जि. पुणे) व आकाश जगन्नाथ वाघमोडे (वय-28 रा. कुर्डुवाडी ता. माढा, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी पवन गोरख मिसाळ (वय-29), महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय-26 दोघे रा. उरुळी कांचन ता. हवेली), मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे (वय-34 रा. राहु, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली आहे. तपासात गुन्ह्यात (Pune Crime) वापरलेली गावठी पिस्तूल अभिजीत यादव व आकाश वाघमोडे यांनी पुरवल्याचे निष्पन्न झाले.

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वर्षापुर्वी दोन भावांना ठार मारल्याचा राग, जगताप करत असलेला वाळुचा व्यवसाय (sand) या गोष्टींवरुन गुन्ह्याचा मास्टरमाईंड उमेश सोपान सोनवणे (Umesh Sopan Sonawane) सह चौघांनी एकत्रित येऊन संतोष जगताप याचा 22 ऑक्टोबरला भरदिवसा गोळ्या घालून खून केला. या घटनेत जगतापचा अंगरक्षक शैलेंद्र सिंग व मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते. तसेच जगताप याच्या अंगरक्षकाकडून केलेल्या गोळीबारात एका हल्लेखोराचा जागीच मृत्यू (Pune Crime) झाला होता.

गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पिस्तूल बाबत तपास करण्याचे आदेश तपास पथकाला देण्यात आले होते.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), हवालदार नितीन गायकवाड,
श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, शैलेश कुदळे, राजेश दराडे यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे दोघांचा शोध घेतला.
आरोपांना बारामती येथून सापळा रचून अटक केली.

 

Web Title :- Pune Crime | Santosh Jagtap murder case loni kalbhor police arrest two who give pistol to criminals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारने 6.5 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये पाठवली दिवाळीची भेट, तात्काळ ‘या’ पद्धतीने जाणून घ्या शिल्लक

PM KISAN | पती-पत्नी दोघेही घेऊ शकतात का पीएम किसान योजनेतून वार्षिक 6,000 रुपये? जाणून घ्या नवीन नियम

Ajit Pawar | ‘आज गडी लय जोरात हाय… जास्त बोलत नाही’; अजित पवारांकडून राजेंद्र पवार यांना ‘कोपरखळी’