SBI नं पेन्शनधारकांसाठी केलं ‘हे’ मोठं काम, पेन्शनसंबंधीत सर्व सर्व्हिस होणार सोप्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – State Bank Of India (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी पेन्शनसंबंधी सर्व सेवा सोप्या करण्यासाठी आपली पेन्शन सेवा वेबसाइट अपग्रेड केली आहे. एसबीआयने (SBI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

एसबीआयने आपल्या ग्राहकांना ट्विट करत माहिती दिली की, सर्व पेन्शनधारकांसाठी खूशखबर! तुमच्या पेन्शनसंबंधी सर्व सेवा सोप्या करण्यासाठी आम्ही पेन्शन सेवा वेबसाइटला नवीन रूप दिले आहे. यासाठी ग्राहकांना बँकेची वेबसाइट https://www.pensionseva.sbi/ वर क्लिक करावे लागेल.

याशिवाय एसबीआयने याबाबत आपल्या ट्विटरद्वारे अधिक माहिती उपलब्ध केली आहे. बँकेने लिहिले आहे की, आमच्या नवीन आणि अपग्रेडेड SBI पेन्शन सेवा वेबसाइटवर उपलब्ध सर्व्हिस एक्सप्लोर करा.

या सेवा मिळतील

वेबसाइटद्वारे ग्राहक पेन्शन स्लिप आणि फार्म 16 डाऊनलोड करू शकतात.

ग्राहक पेन्शन संबंधी ट्रांजक्शन डिटेलसुद्धा मिळवू शकतात.

एरियर कॅलक्युलेशन शीट सुद्धा डाऊनलोड करू शकतात.

इनव्हेस्टमेंटसंबंधी डिटेलसुद्धा मिळवू शकतात.

लाईफ सर्टिफिकेट स्टेटस आणि पेन्शन प्रोफाइल डिटेलसुद्धा मिळवू शकतात.

पेन्शनर्ससाठी इतर सुविधा

पेन्शनर्सला मोबाइलवर एसएमएस अलर्टद्वारे पेन्शन डिटेल्स पाठवल्या जातील.

ब्रँचवर जीवन दाखल्याची सुविधा उपलब्ध असेल.

पेन्शनर्स ईमेल किंवा पेन्शन पेईंग ब्रँचपासून पेन्शन स्लीपसुद्धा मिळवू शकतात.

सोबतच SBI च्या कोणत्याही शाखेत लाईफ सर्टिफिकेट जम करण्याची सुविधा मिळते.

Web Titel :-  SBI | sbi upgraded its pension service website all pension related services will be easily managed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CNG-PNG Prices | सर्वसामान्यांना पुन्हा बसणार झटका ! पुढील महिन्यात 10-11 % वाढू शकतात CNG चे दर

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 294 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Saki Naka Rape Case | ही घटना दुर्दैवी; साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास 1 महिन्यात – CP हेमंत नगराळे