SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! शुक्रवारी ‘या’ वेळेला 3 तासासाठी बंद राहिल बँकेची ‘ही’ सर्व्हिस, चेक करा टायमिंग

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 44 कोटी खातेधारकांसाठी महत्वाची सूचना (SBI Important Notice) जारी केली आहे. बँकेने ट्विट करून आपल्या ग्राहकांना अलर्ट केले आहे आणि त्यांना गरजेनुसार बँकिंगसंबंधी कामे अगोदरच उरकून घेण्याची विनंती केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्वाची सूचना जारी करून म्हटले आहे की, बँकेच्या काही महत्वाच्या सर्व्हिस उद्या आणि परवा बंद राहतील.

एसबीआयने ट्विटरवर म्हटले की, सिस्टम मेन्टनसमुळे 6 आणि 7 ऑगस्टला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि UPI सर्व्हिसचा समावेश आहे. एसबीआयने ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की या सेवा 6 आणि 7 ऑगस्टच्या रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून रात्री उशीरा 1 वाजून 15 मिनिटापर्यंत (150 मिनिटे) या सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

एसबीआयद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आणखी चांगली सेवा देण्यासाठी बँक आपला UPI प्लॅटफॉर्म अपग्रेड करणार आहे. या दरम्यान ग्राहकांना यूपीआई ट्रांजक्शन बंद राहील.

यापूर्वी सुद्धा सेवा होती बंद

एसबीआय पहिल्यांदा अशाप्रकारे सेवा बंद करत नसून यापूर्वी सुद्धा बँकेने 16 आणि 17 जुलैला
रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून रात्री उशीरा 1 वाजून 15 मिनिटापर्यंत या सेवा बंद केल्या होत्या.

हे देखील वाचा

Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चासह इतर संघटनांची सोमवारी पुण्यात बैठक (व्हिडीओ)

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA मध्ये झाली वाढ, जाणून घ्या कोण-कोणत्या राज्यात कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल वाढ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  sbi services internet banking yono yono lite upi closed tomorrow during this period check

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update